व्हेज शेज़वान फ्रॅंकी (Veg Schezwan Frankie recipe in marathi)

Riya Vidyadhar Gharkar
Riya Vidyadhar Gharkar @rvgharkar89

#bfr -
व्हेज फ्रँकी रोल रेसिपी / Veg Frankie रेसिपी एक प्रसिद्ध आणि हेल्थी डिश रेसिपी आहे.त्याची आंबट किंवा मसालेदार चव तुमच्या आवडीनुसार बनवता येते. लहान मुले आणि प्रौढ ते मोठ्या आवडीने खातात.मुलांच्या टिफिनमध्येही देता येते. हे बनवण्यासाठी वापरलेले साहित्य सहज उपलब्ध आहे. फ्रँकी रोल बनवणे सोपे आहे. घरी सुद्धा सहज बनवता येते.😋

व्हेज शेज़वान फ्रॅंकी (Veg Schezwan Frankie recipe in marathi)

#bfr -
व्हेज फ्रँकी रोल रेसिपी / Veg Frankie रेसिपी एक प्रसिद्ध आणि हेल्थी डिश रेसिपी आहे.त्याची आंबट किंवा मसालेदार चव तुमच्या आवडीनुसार बनवता येते. लहान मुले आणि प्रौढ ते मोठ्या आवडीने खातात.मुलांच्या टिफिनमध्येही देता येते. हे बनवण्यासाठी वापरलेले साहित्य सहज उपलब्ध आहे. फ्रँकी रोल बनवणे सोपे आहे. घरी सुद्धा सहज बनवता येते.😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3-4 माणसांसाठी
  1. पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  2. 1 कपमैदा
  3. 1/2 कपगव्हाचे पीठ
  4. चवीनुसारमीठ
  5. 2 चमचेतेल
  6. पाणी
  7. स्टफिंग बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  8. 1/2 कपकिसलेला गाजर
  9. 1/2 कपबारीक चिरलेली शिमला मिरची
  10. 1 कपचिरलेला कोबी
  11. 1/2 कपमटर
  12. 1/2 कपस्वीट कॉर्न
  13. 1/2 कपचिरलेला कांदा
  14. 2 टेबलस्पूनशेजवान चटणी
  15. 2 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  16. 1 टेबलस्पूनसोया सॉस
  17. 2 टीस्पूनतेल
  18. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  19. 1 चमचाआलं व लसूण पेस्ट
  20. पिझ्झा सॉस
  21. चवीनुसारमीठ
  22. चीज

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    पराठा बनवण्यासाठी मैदा आणि गव्हाच्या पिठात चवीपुरते मीठ आणि 2 टीस्पून तेल टाकून मिक्स करून घ्या आणि नंतर थोडे थोडे पाणी घेऊन घट्ट मळून 15 मिनिटे बाजूला ठेवा.

  2. 2

    पॅनमध्ये तेल गरम करून आलं-लसूण व हिरवी मिरची परतून घ्या, नंतर त्यात कांदा व भाज्या घालून 2 मिनिटे परतून त्यात शेजवान चटणी,सोयासॉस,टोमॅटो सॉस,आणि चवीपुरते मीठ टाकुन व्यवस्थीत मिक्स करून घ्या.

  3. 3

    पिठाचे छोटे छोटे गोळे करून पातळ पोळी लाटून घ्या.तवा गरम करून पोळी दोन्ही बाजुने तेल लावून भाजून घ्या.

  4. 4

    पोळी भाजून झाल्यानंतर पोळीला पिझ्झा सॉस लावून वरती stuffing टाका वरून आवडीनुसार चीज टाकून पोळीचा रोल करून घ्या.

  5. 5

    फ्रांकी रोल तयार झाल्यावर डिशमध्ये ठेवून गार्निश करून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Riya Vidyadhar Gharkar
रोजी
🍽I’m Riya. On my page, you will find ideas of cooking and some of the delicious food. I ❤ Cooking and sharing my experiences with you. Follow to discover the joy of cooking.I think GOOD FOOD IS GOOD MOOD.In my life, I like to do lot of activities, but my favourite activity is cooking becuase cooking is very simple.🙂 I have also a YouTube channel https://www.youtube.com/c/UNIQUERIYASKITCHEN
पुढे वाचा

Similar Recipes