गर्लिक टोमॅटो राइस (Garlic tomato rice recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#EB14#W14...भाताचा आणखी एक प्रकार..
One pot meal.... चवीसाठी टाकलेला लसूण... आणि पौष्टिकता वाढविण्यासाठी मोड आलेले मूग... मस्त स्वादिष्ट...

गर्लिक टोमॅटो राइस (Garlic tomato rice recipe in marathi)

#EB14#W14...भाताचा आणखी एक प्रकार..
One pot meal.... चवीसाठी टाकलेला लसूण... आणि पौष्टिकता वाढविण्यासाठी मोड आलेले मूग... मस्त स्वादिष्ट...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 -25 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतांदूळ
  2. 10-12लसूण पाकळ्या बारीक चिरून
  3. 1/2 वाटीमोड आलेले मूग
  4. 2टोमॅटोची पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1 टेबलस्पूनबटर
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1हिरवी मिरची
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनमॅगी मसाला
  11. चवीनुसारमीठ
  12. भरपूर कोथिंबीर
  13. 2 वाट्यापाणी, आवश्यकतेनुसार जास्त

कुकिंग सूचना

20 -25 मिनिट
  1. 1

    सर्व सामग्री एकत्र ठेवावी. तांदूळ दोन तीन वेळा धुवून, 15 मिनिट भिजत ठेवावे., टोमॅटोची पेस्ट करून घ्यावी. लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्याव्यात.

  2. 2

    एका कढईत तेल आणि बटर टाकून, ते वितळल्यावर, जीरे टाकावे. बारीक चिरलेला लसूण टाकावा. हे सर्व कमी आचेवर करावे.

  3. 3

    हिरवी मिरची टाकून, लसूण ब्राऊन होऊपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात मोड आलेले मूग टाकावे. पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेतल्यावर, त्यात टोमॅटो पेस्ट टाकावी.

  4. 4

    चवीनुसार मीठ टाकावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे. आता झाकण ठेवून 2-3 मिनिट शिजवावे. त्यानंतर, त्यात हळद आणि मॅगी मसाला, आणि भरपूर कोथिंबीर टाकावी.

  5. 5

    मिक्स करून घ्यावे व आता त्यात गरम केलेले पाणी टाकावे. गॅस मोठा करून, त्याला उकळी आणावी.

  6. 6

    नंतर त्यात निथळून घेतलेले, तांदूळ टाकावे. त्यालाही उकळी आली की, मंद आचेवर, झाकण ठेवून शिजवावे.

  7. 7

    आता टोमॅटो भात तयार झालेला आहे. गरमागरम, आवडीनुसार कोथिंबीर आणि तूप टाकून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes