झटपट क्रिस्पी साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

# श्रावण स्पेशल
उपवासाचा साबुदाणे न भिजवता कुरकुरीत व पटकन होणारा वडा.श्रावणात अनेक उपास असतात. काहीतरी वेगळं खावस वाटते . साबुदाणे भिजवून करायला बराच वेळ जातो. मग असे झटपट साबुदाणा वडा करून पहा.

झटपट क्रिस्पी साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

# श्रावण स्पेशल
उपवासाचा साबुदाणे न भिजवता कुरकुरीत व पटकन होणारा वडा.श्रावणात अनेक उपास असतात. काहीतरी वेगळं खावस वाटते . साबुदाणे भिजवून करायला बराच वेळ जातो. मग असे झटपट साबुदाणा वडा करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 3मध्यम आकाराचे बटाटे
  2. 1 कपसाबुदाणे
  3. 2 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कुट
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर (ऑप्शनल)
  6. 4-5कढीपत्त्याची पाने (ऑप्शनल)
  7. 1 टेबलस्पूनजिरें
  8. 1/2लिंबाचा रस
  9. 1 टेबलस्पूनसाखर
  10. 1 टेबलस्पूनमीठ
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    साबुदाणे स्वच्छ निवडून मिक्सर मधून बारीक करून घ्यावेत

  2. 2

    बटाटे स्वच्छ धुऊन उकडून साले काढून किसून घ्यावेत.

  3. 3

    किसलेल्या बटाट्यात बारीक केलेला साबुदाणा, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लिंबाचा रस, मीठ आणि साखर घालून सर्व मिक्स करून घ्यावे. पाणी घालू नये. बटाट्याचा किसात जेवढं साबुदाण्याचे पीठ मावेल तेव्हढंच घालावे.

  4. 4

    एक ट्रे मध्ये किंवा ताटात तयार मिश्रण एकसारखे पसरून ट्रे पंधरा ते वीस मिनिटे फ्रीज मध्ये ठेवावा.

  5. 5

    आवडतील त्या आकाराचे वडे पाडावेत

  6. 6

    गॅसवर तेल तापवून मध्यम आचेवर वडे गोल्डन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्यावेत.

  7. 7

    क्रिस्पी साबुदाणा वडा तयार. दही किंवा शेंगदाणा चटणी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

Similar Recipes