प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#trending recipe
भक्तीभावाने परमेश्वराला काही अर्पण केले की तो "प्रसाद"असतो,आणि सगळेच तो आवडीने घेतात.
कुठलीही पुजा असली की सर्वसाधारणपणे केला जातो तो शिरा...तसंच प्रसाद म्हणून नसतानाही अगदी प्रसादासारखाच केला तरी अधूनमधून आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ..एक दोन दिवस सहज पुरणारा!
या प्रसादाचा उल्लेख श्रीसत्यनारायणाच्या पूजेत आहेच.आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात,दुःख नाहीसे व्हावे किंवा मनोरथ पूर्ण झाले की हमखास केला जातो तो श्रीसत्यनारायण !
श्रीविष्णुंची ही पूजा आहे जी घरोघरी श्रावणात किंवा वर्षांतून एकदा तरी केलीच जाते. धनधान्य,संतती,संपत्ती ,सौख्य देणारे हे व्रत आहे.
सव्वा पटीच्या प्रमाणात याचा प्रसाद करतात.व नैवेद्य दाखवतात. देवाला अर्पण करायचा,म्हणून केला असल्याने याची चव नेहमीच्या शिऱ्यापेक्षा फारच सुंदर लागते!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
7-8 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कप बारीक रवा
  2. 1/4 कप साजुक तूप
  3. 1/4 कप साखर
  4. 2.5 कप दूध (थोडे जास्त लागल्यास आणखी घालावे)
  5. 1गोड केळे
  6. १ टीस्पून वेलचीपूड
  7. 8-10बदाम
  8. 8-10काजू
  9. 10-15बेदाणे
  10. 8-10केशराच्या काड्या

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    प्रसादाच्या शिऱ्याची सर्व पूर्वतयारी करून घ्यावी.

  2. 2

    गँसवर कढई तापत ठेवून त्यात मोजून घेतलेले तूप घालावे.गरम होऊ द्यावे.त्यावर बारीक रवा घालावा.रवा छान गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजावा.

  3. 3

    केळ्याचे पातळ काप करुन घ्यावेत.ते रवा भाजत आल्यावर घालावेत.अजून 5-7मिनिटे रवा, केळी एकजीव होईपर्यंत भाजावा.मंद सुवास दरवळू लागेल. आता त्यावर दूध घालावे व भरभर हलवावे.गाठी होऊ देऊ नयेत.वाटल्यास अजून थोडे दूध रवा शिजण्यापुरते घालावे.म्हणजे शिरा मऊ होतो.

  4. 4

    या मिश्रणात साखर घालावी. व चांगले हलवावे.साखर विरघळली की गाठी झाऱ्याने मोडाव्यात.

  5. 5

    काजू-बदाम यांची पावडर करुन घ्यावी.

  6. 6

    काजूबदाम पावडर शिऱ्यावर घालावी.वेलचीपूड,बेदाणे व केशर घालावे.शिरा व्यवस्थित हलवून झाकण घालावे व वाफ येऊ द्यावी.5मिनिटांनी झाकण काढून पुन्हा हलवावे.प्रसाद शिरा तयार आहे.

  7. 7

    देवाला नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद खाण्यास द्यावा.😋😋😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes