आजचा नाश्ता पालक पराठे (palak paratha recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

आजचा नाश्ता पालक पराठे (palak paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ जणांसाठी
  1. 1/2जुडी पालक
  2. २-३ हिरव्या मिरच्या
  3. ७-८ लसूण पाकळ्या
  4. १ इंच आल
  5. 1 वाटी कणिक
  6. 2 तांदूळ पीठ
  7. 1/2 चमचाहळद
  8. १-१/२ चमचा लोणच्याचा मसाला
  9. १ चमचा धणे पूड
  10. १/२ चमचा आमचूर पावडर
  11. चवीप्रमाणे मीठ
  12. 2 चमचा तेल
  13. पराठे भाजण्यासाठी तेल/अमूल बटर

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ निवडून धुवून त्यांत हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या वआलं घालून पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    नंतर त्यांत हळद, लोणच्याचा मसाला, धणे पूड, आमचूर पावडर, चवीप्रमाणे मीठ व दोन चमचे तेल घालून त्यांत कणिक व तांदळाचे पिठ घालून कणिक मळून घ्यावी शक्यतो पालक पेस्टमध्येच कणिक मळावी व पाण्याचा वापर कमी असावा.

  3. 3

    नंतर त्याचे पराठे चपातीपेक्षा थोडे जाडसर लाटून घ्यावे व तव्यावर भाजून घ्यावेत व भाजतांना मधे मधे थोडे तेल किंवा अमूल बटर लावावे.
    टोमँटो साँसबरोबर गरमागरम सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes