पालक मसाला चक्री पराठा (palak masala chakhri paratha recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#ccs पराठा साऱ्यांचाच आवडीचा .. त्यातही अनेक प्रकार ! पण मी मात्र आज एक आगळावेगळा पराठा केला आहे . पालक , मसाला घालून . खुसखुशीत , लज्जतदार, मसाला पराठा बनविलाय .
अगदी सोपा , पटकन होणारा . खाऊन तरी पहा .. दिल खुश होईल..

पालक मसाला चक्री पराठा (palak masala chakhri paratha recipe in marathi)

#ccs पराठा साऱ्यांचाच आवडीचा .. त्यातही अनेक प्रकार ! पण मी मात्र आज एक आगळावेगळा पराठा केला आहे . पालक , मसाला घालून . खुसखुशीत , लज्जतदार, मसाला पराठा बनविलाय .
अगदी सोपा , पटकन होणारा . खाऊन तरी पहा .. दिल खुश होईल..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंगस
  1. 100 ग्रॅमगहू पीठ
  2. 1 टीस्पूनडाळीचे पीठ
  3. 8-10 पालक पाने
  4. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  5. 1.5 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनकाळा मसाला
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनधणे-जीरे पूड
  9. 1 टीस्पूनशेंगदाणा कूट
  10. चवी पुरते मीठ
  11. बटर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    पालकाची पानं स्वच्छ धुऊन घ्या. पालक व कोथिंबीर एकत्र करून, थोडेसे पाणी टाकून, मिक्‍सरवर फिरवून त्याची पेस्ट तयार करा. गव्हाच्या पिठात, डाळीचे पीठ, एक टीस्पून मोहन तेल व चवी पुरते मीठ टाकून, पालकाच्या ग्रेव्ही ने ती कणीक मध्यम घट्टसर मळा. 10 मिनिटांसाठी झाकून मुरवूत ठेवा.

  2. 2

    तोवर गॅसवर, छोट्या कढईत तेल टाकून, त्यांत हिंग,मोहरी,जीरे टाका. ती तडतडल्यावर,गॅस बंद करा. कढई खाली उतरवून त्यांत, काळा मसाला, लाल तिखट,धनेजिरे पूड,शेंगदाणा कूट, चिमूटभर मीठ व थोडीशी कोथिंबीर टाकून, खमंग अशी फोडणी तयार करा. ती गार करा.

  3. 3

    मुरलेल्या कणीकेचे मध्यम आकाराचे गोळे करा. एका गोळ्याला पीठ लावून, त्याची पातळसर पोळी लाटा. त्यावर तेलाचा मसाला हलक्या बोटाने पसरून, संपूर्ण पोळीला लावा. आता पोळी हलक्या हाताने गुंडाळत त्याची गुंडाळी तयार करा. ती हाताने लांबवत, आणखी थोडीशी लांब करा. ही गुंडाळी गोलाकार चकली प्रमाणे फिरवा. चकली एकमेकांना चिटकून राहील अशा पद्धतीने ती फिरवा.

  4. 4

    आता त्या चकलीला हलक्या हाताने दाब देऊन, पीठ लावून, चकलीचा किंचित जाडसर पराठा लाटा व तव्यावर दोन्ही बाजूंनी बटर लावून खरपूस भाजा.

  5. 5

    खरपूस,खुसखुशीत,मस्त मसालेदार पराठा तयार झाला.तो लोणी, सॉस किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा व मज्जा लुटा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes