पावभाजी मसाला पराठा (pavbhaji masala paratha recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#breakfast #paratha #dinner
बायकांना रोज काय करायचं हा प्रश्नच पडतो, कधी-कधी तर कंटाळा आलेला असतो. अशा वेळी पटकन् होणारी साधी रेसिपी हवीच असते. माझ्या घरी पराठ्याचे कोणतेही प्रकार आवडीने खाल्ले जातात. स्टफ्फ पराठ्याचे वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो पण आज मी नॉर्मल मसाला पराठा केला आहे ज्यामध्ये पावभाजी मसाला घालून छान स्वाद निर्माण केला आहे. या पराठ्या साठी काहीच विशेष तयारी लागत नाही अगदी आयत्या वेळी पटकन् होणारा पराठा आहे. तुम्ही आवडीनुसार वेगळे मसाले वापरु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपगहू पीठ
  2. 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  5. 1/2 टीस्पूनपेरी पेरी मसाला
  6. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  7. कोथिंबीर आणि बेसिल ची पाने
  8. तेल
  9. अमूल बटर
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम नेहमीप्रमाणे कणीक भिजवून घ्यावी. एका भांड्यामध्ये पावभाजी मसाला,चाट मसाला, लाल तिखट, पेरी पेरी मसाला, मीठ हे सर्व एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    कोथिंबिरीची आणि बेसिलची पाने (ऑप्शनल) धुवून बारीक चिरून घ्यावी. हव्या त्या आकाराच्या कणकेचा गोळा करून त्याची पोळी लाटून घ्यावी आणि त्यावर तयार केलेला मसाला व्यवस्थित सर्व बाजूला पसरवा. त्यावर पांढरे तीळ, चिरलेली कोथिंबीर आणि बेसिल पसरवा.

  3. 3

    ही पोळी हळूहळू रोल करायला सुरुवात करा, रोल करताना पोळी उचलून थोडी पुढे घ्या आणि तेवढाच भाग परत पाठी येऊन एकावर एक ठेवा. असे शेवटपर्यंत करून नंतर मध्ये बोट ठेवून हा रोल फिरूवून मध्ये त्याचा शेवट मधल्या गोलात दाबून बंद करा. असे सर्व पराठे गोल तयार करून घ्या.

  4. 4

    आता एक एक तयार गोळा घेऊन हलक्या हाताने पराठा लाटून घ्या आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी भरपूर तेल किंवा तूप घालून व्यवस्थित शेकून घ्या. वर अमूल बटर लावून दह्याबरोबर गरम गरम हा पराठा सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes