स्टीर फ्राय बटर चिकन इन ग्रेव्ही (butter chicken in gravy recipe in marathi)

#ccs
#कूकपॅड_ची_शाळा
#सत्र_दुसरे
"स्टीर फ्राय बटर चिकन इन ग्रेव्ही"
बटर चिकन ची गाथा....!!!
पेशावर.. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेलं गांव. या पंजाबमध्ये असणाऱ्या गावात मुखेदा ढाबा हा ढाबा होता. या ढाब्यावर कुंदनलाल गुजराल नांवाचा माणूस काम करत होता.
मुखेदा ढाबा आता मोतीमहल नांवाने ओळखला जाऊ लागला. या ढाब्याची खासियत म्हणजे तंदुरी चिकन..हे चिकन बनवताना थोडे चिकनचे तुकडे उरत. मग ते उरलेले तुकडे, न वापरलेलं चिकन कधी कधी टाकून द्यावे लागत.
पण ते तुकडे पण वापरुन कुंदनलाल वेगळे काही प्रयोग करत. ते चिकन वाया जाऊ नये म्हणून टोमॅटो, फ्रेश क्रीम, बटर, दाट ग्रेव्ही, वाटलेलं वाटण यांचा वापर करुन ते काही ना काही करुन बघत. आणि यातूनच जन्माला आली बटर चिकन डिश!
नंतर भारत स्वतंत्र झाला आणि फाळणीनंतर कुंदनलाल गुजराल भारतात आले. दिल्ली येथे दरियागंज भागात त्यांनी आपलं हाॅटेल थाटलं. नांव तेच होतं मोतीमहल.
तेव्हा गुजराल यांना जराही कल्पना नव्हती की आपली बटर चिकन ही डिश आपली खासियत बनून आपल्याला जगभरात प्रसिद्ध करेल.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यात समतोल आहार राखण्यासाठी असलेली मेथीची किंचित कडवट चव, लसुण पेस्ट यांनी अॅसिडीटीची तीव्रता कमी करायला येते.
तर बटर आणि क्रीम यांच्यामुळे वाढणारा मेद कमी करण्यासाठी पण मेथी आणि लसूण कामी येतात. अन्नसुरक्षा तज्ज्ञ म्हणतात, बटर चिकन फार झणझणीत किंवा फार फिक्कं, गोडसर केलं तर त्याची चव बिघडते.
बटर चिकनचा मोहात पाडणारा स्वाद, आंबटगोड चव, आणि मऊ लुसलुशीत दिसणारं त्याचं रुपडं पाहून कोणत्याही मांसाहारी माणसाला सुख झाले हो साजणी हीच भावना होते.
Cp
स्टीर फ्राय बटर चिकन इन ग्रेव्ही (butter chicken in gravy recipe in marathi)
#ccs
#कूकपॅड_ची_शाळा
#सत्र_दुसरे
"स्टीर फ्राय बटर चिकन इन ग्रेव्ही"
बटर चिकन ची गाथा....!!!
पेशावर.. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेलं गांव. या पंजाबमध्ये असणाऱ्या गावात मुखेदा ढाबा हा ढाबा होता. या ढाब्यावर कुंदनलाल गुजराल नांवाचा माणूस काम करत होता.
मुखेदा ढाबा आता मोतीमहल नांवाने ओळखला जाऊ लागला. या ढाब्याची खासियत म्हणजे तंदुरी चिकन..हे चिकन बनवताना थोडे चिकनचे तुकडे उरत. मग ते उरलेले तुकडे, न वापरलेलं चिकन कधी कधी टाकून द्यावे लागत.
पण ते तुकडे पण वापरुन कुंदनलाल वेगळे काही प्रयोग करत. ते चिकन वाया जाऊ नये म्हणून टोमॅटो, फ्रेश क्रीम, बटर, दाट ग्रेव्ही, वाटलेलं वाटण यांचा वापर करुन ते काही ना काही करुन बघत. आणि यातूनच जन्माला आली बटर चिकन डिश!
नंतर भारत स्वतंत्र झाला आणि फाळणीनंतर कुंदनलाल गुजराल भारतात आले. दिल्ली येथे दरियागंज भागात त्यांनी आपलं हाॅटेल थाटलं. नांव तेच होतं मोतीमहल.
तेव्हा गुजराल यांना जराही कल्पना नव्हती की आपली बटर चिकन ही डिश आपली खासियत बनून आपल्याला जगभरात प्रसिद्ध करेल.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यात समतोल आहार राखण्यासाठी असलेली मेथीची किंचित कडवट चव, लसुण पेस्ट यांनी अॅसिडीटीची तीव्रता कमी करायला येते.
तर बटर आणि क्रीम यांच्यामुळे वाढणारा मेद कमी करण्यासाठी पण मेथी आणि लसूण कामी येतात. अन्नसुरक्षा तज्ज्ञ म्हणतात, बटर चिकन फार झणझणीत किंवा फार फिक्कं, गोडसर केलं तर त्याची चव बिघडते.
बटर चिकनचा मोहात पाडणारा स्वाद, आंबटगोड चव, आणि मऊ लुसलुशीत दिसणारं त्याचं रुपडं पाहून कोणत्याही मांसाहारी माणसाला सुख झाले हो साजणी हीच भावना होते.
Cp
कुकिंग सूचना
- 1
आधी मॅरीनेशन करून घेऊ
त्या साठी एका बाउल मध्ये दही व इतर सर्व जिन्नस एक एक करून घालून घ्या - 2
आणि मिक्स करून घ्या
- 3
आता चिकन चे पातळ तुकडे करून स्वच्छ करून घ्या
- 4
आणि तयार मॅरीनेट मध्ये घालून मिक्स करा, आणि पुढील 1 तास चिकन मॅरीनेट होऊ द्या
- 5
चिकन मॅरीनेट होतंय तो पर्यंत ग्रेव्ही ची तयारी करूया, त्या साठी एका कढई किंवा पॅन मध्ये बटर किंवा तेल गरम करा, आणि त्यात कांदा,आलं लसूण पेस्ट फ्राय करून घ्या
- 6
नंतर त्यात टोमॅटो आणि काजू घालून मिक्स करा,गरजेनुसार पाणी घाला आणि 10 मिनटं मिश्रण सिमर होऊ द्या (टोमॅटो मऊ हाऊ द्या)
- 7
नंतर त्यात काश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा, मिश्रण थंड होऊ द्या, नंतर मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
- 8
आता तयार ग्रेव्ही गाळणीने दुसऱ्या एका कढई मध्ये गाळून घ्या, त्यात बटर घाला आणि ग्रेव्ही मंद आचेवर शिजू द्या,
- 9
आता चिकन फ्राय करायला घेऊया
1 तास चिकन मॅरीनेट झाल्यावर, तव्यावर बटर लावून चिकन पीस स्टीर फ्राय करून घ्या, ग्रिल केले तरी चालेल - 10
आणि चिकन बाजूला काढून चिकन श्रेडेड करून घ्या,(म्हणजे छोटे छोटे तुकडे करून घ्या)
- 11
तयार ग्रेव्हीवर परत बटर घालून घ्या (आवडत असल्यास)
आणि चिकन चे पीस घालून ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्या - 12
सर्व्ह करताना वरून अजून थोडे चिकन चे पीस घालू शकता, दिसायला आणि चवीला ही खूप छान लागेल...👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4#Week15#ChikenButterchikenघरी बटर चिकन कसे बनवायचे ते सांगते, त्याची चव खूपच चवदार, मलाईदार आणि स्वादिष्ट आहे. बटर चिकन, ज्याला चिकन मखानी म्हणूनही ओळखले जाते, जगभरातील बर्याच लोकांना आवडलेल्या डिशपैंकी एक लोकप्रिय डिश आहे. लवकरच येणाऱ्या न्यू इअर पार्टी साठी स्पेशल डिश बटर चिकन😘 Vandana Shelar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4 #week1 बटर चिकन की पंजाबी डिश आहे. बटर चिकन हे पंजाबमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. बटर चिकन कशी तयार झाली या मध्ये सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. कुंदनलाल गुजरालयांनी ही डिश इंवेन्टेड केली आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदनलाल हे दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी मोती महल नावाचे एक रेस्टॉरंट चालू केले. तेव्हा उरलेले चिकन ठेवण्यासाठी फ्रीज वगैरे काही नव्हते. उरलेले तंदुरी चिकन हे दुसऱ्या दिवशी त्याची चव बदलते हे त्यांच्या लक्षात आले. त्या चिकनचे काय करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा जर तंदूर मध्ये टाकले तर ते खूप ड्राय होईल. म्हणून त्याने टोमॅटोची एक अशा प्रकारची ग्रेवी बनवली व त्यामध्ये चिकन टाकले. तरीसुद्धा ग्रेव्ही फार काही टेस्टी लागत नव्हती तेव्हा त्यामध्ये मलई व खूप साऱ्या प्रमाणात बटर टाकले पत्ता ग्रेव्हीला एक छान टेस्ट अशाप्रकारे बटरचिकन चा जन्म झाला. Purva Prasad Thosar -
मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
#rr" मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही " रेस्टॉरंट मध्ये गेलो, की कोल्हापुरी,हैद्राबादी, पंजाबी, मुगलाई, असे बरेच प्रकार खायला मिळतात, आणि आपण ही, नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज च्या प्रेमात पडतो...!!काहीतरी वेगळं आणि चमचमीत खाण हे सर्व खवय्यांसाठी सोने पे सुहागा वाली फीलिंग देत....!!तर आज मी मोगलाई चिकन ग्रेव्हीचा प्रकार बनवून पहिला मोगलाई प्रकारच्या खाण्यात तीन बेसिक ग्रेव्हीज् आढळतील. मखनी, सफेद ,ब्राऊन आणि रेड ग्रेव्ही. कांदा, काजू कणी, खसखस, टोमॅटो यांच्यातून ही बेसिक किंवा मूळ रस्सा तयार होतो. या पावसात मस्त अशा मसालेदार आणि फ्लेवरफुल रेसिपीचा आनंद घ्या...👌👌 Shital Siddhesh Raut -
बटर चिकन(butter chicken recipe in marathi)
#goldenapron3 week 21 chickenबटर चिकन हे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं. नेहमी घरी बनवलं जातं. आणि जेव्हा कधी रेस्टॉरंट मधे जायचो तेव्हा मुलं हमखास बटर चिकन याच डिशची फर्माइश करत. म्हणून मुलांच्या आवडीची ही डिश अगदी रेस्टॉरंट स्टाईल करायला शिकले. आणि खूप छान टेस्ट जमली. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
स्पायसी चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला कोणत्याही पद्धतीने बनवले तरी त्याची टेस्ट ही अप्रतिमच लागते....😋😋👌आज मी माझ्या घरी जी नेहमी वाटप घालून चिकन ग्रेव्ही बनवते .ती रेसिपी मी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चमचमीत आणि झणझणीत रेस्टॉरंट स्टाइल चिकन ग्रेव्ही बनवली आहे. भाकरी चपाती आणि भातासोबतही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते. Poonam Pandav -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकुकपॅडची शाळा सत्र दुसरेपझलमधील नाव ओळखून केले बटर चिकन Pragati Hakim -
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#नॉनवेज ढाबा स्टाईल रेसिपी बटर चिकन माझ्या घरी सगळ्यांचीच आवडती व करायलाही सोप्पी चला तर बघुया बटर चिकनची रेसिपी Chhaya Paradhi -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 "कूकपॅड रेसिपी मॅगझीन"कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी "चिकन ग्रेव्ही" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
ढाबा स्टाईल चिकन इन रेड ग्रेव्ही (chicken in red gravy recipe in marathi)
#rr आज आहे संडे मग काय नॉनव्हेजचा बेत तर होणारच.. खूप दिवसांपासून मुलांची फर्माईश होते चिकनची ..मग काय मस्त ढाबा स्टाईल रेड ग्रेव्ही मध्ये चिकन बनविले. Reshma Sachin Durgude -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकूकपॅड ची शाळा सत्र दुसरे यासाठी मी बटर चिकन बनवले आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
#BR2 नॉनव्हेज रेसिपीज कोणाला आवडत नाहीत आज आपण बघणार आहोत चिकन ग्रेव्ही पण ही थोडी थिक ग्रेवी आहे नेहमीची ग्रेव्ही ही ग्रेव्ही थोडी वेगळी आहे Supriya Devkar -
बटर चिकन (butter chicken recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1Post2माझी व माझ्या घरातील सर्वांच्याच आवडीची अशी ही बटर चिकन .ही बटर चिकन ची रेसीपी मला माझी वहिनी सौ.नेहा कर्णिक व माझी बहिण सौ.नुतन प्रधान ह्यांनी सांगीतल्या प्रमाणे मी तयार केली आहे. Nilan Raje -
चिकन क्रिमी मसाला ग्रेव्ही (chicken gravy masla gravy recipe in marathi)
#GA4 #week15 #chickenथंडीच्या दिवसात गरमागरम चिकन खाणं म्हणजे नाॅनव्हेज प्रेमींसाठी पर्वणीच असते. हेल्थ साठी पण चांगले असते. तसेच त्यात फ्रेश क्रीम घालून त्याची लज्जत अजूनच वाढते. याचीच लज्जतदार रेसिपी देत आहे. बनवायला पण जास्त वेळ लागत नाही. Ujwala Rangnekar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी #बटर चिकन मला नॉनवेज फुड खायला व बनवायला नेहमीच आवडते चिकनच्या रेसिपी मध्ये माझी सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन अनेकवेळा मी बनवली आहे पण दरवेळी त्यात थोड बदल करून बनवते चला तर तुम्हाला आज बटर चिकन ची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
ड्रॅगन चिकन (dragon chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी ड्रॅगन चिकन हा एक इंडो चायनीज पदार्थ आहे. क्रिस्पी आणि ग्रेव्ही युक्त अशी डिश आहे हि स्टार्टर म्हणून करू शकतो. आणि स्वाद तर लाजवाब झाला. करताना वाटला नवात मस्त टेस्ट असेल पण फार उत्तम झाली नक्की करून बागा. Veena Suki Bobhate -
चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
आज चिकन ग्रेव्ही मसाला खाण्याची ईच्छा झाली.चला तर मग बनवू या. Dilip Bele -
स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)
बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी... Rashmi Joshi -
झटपट चिकन मसाला ग्रेव्ही (chicken masala gravy recipe in marathi)
#चिकन_मसाला_ग्रेव्ही#tmr#30_मिनिट_रेसिपी_चॅलेंजमी कोणाताही पदार्थ बनवताना तो पदार्थ झटपट आणि चवदार चविष्ट कसा बनेल याकडे लक्ष देते. नवशिके मुलं-मुली आणि एकूणच हल्लीची तरुण पिढी त्यांना आवडणारा पदार्थ अगदी पटकन बनवून हवा असतो, त्यांच्याकडे कामामुळे सगळं सावकाश निवांत बनवायला सवड आणि आवड नसते. अशा वेळी भराभर करुन पटापट खाऊन परत आपापल्या कामात गुंतून जातात. म्हणूनच ही चिकन मसाला ग्रेव्ही बनवायला एकदम सोपी आणि पटकन बनवू शकतो अशी आहे. राईस, रोटी, नान, ब्रेड कशाबरोबर पण खायला खूप छान लागते. Ujwala Rangnekar -
गावरान चिकन ग्रेव्ही (gavran chicken gravy recipe in marathi)
#cpm5आमच्याकडे गावी चूलीवर अश्या पद्धतीने चिकन रस्सा म्हणजेच चिकन ग्रेव्ही ही बनवली जाते. कोंबडी वडे, घावन किंवा भाकरी सोबत ही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
बटर चिकन (Butter Chicken Recipe in Marathi)
#cooksnapव्रूशाली पाटील गावंड यांची रेसिपी विथ लिटल ट्विस्टधाबा स्टाइल बटर चिकन Ankita Khangar -
-
-
"झटपट चिकन करी" (chicken curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#शुक्रवार_चिकन_रस्सा" झटपट चिकन करी " 100+ रेसिपी कधी होऊन गेल्या ते कळलं सुद्धा नाही... सगळे म्हणतात की कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही गोडा धोडाने केली पाहिजे... पण मी थोडं वेगळं करते😊😊 माझा मुलगा हा माझी प्रेरणा आहे, आणि मी कोणत्याही गोष्टीची सुरुवात त्याच्या आवडत्या गोष्टी पासून करते...त्याला नॉनव्हेज खूप आवडते,कदाचित माझ्यापेक्षा पण जास्त...😉😉 म्हणून मी जेव्हा माझे यु ट्यूब चॅनेल सुरु केले, तेव्हा पण मी माझ्या मुलाच्या आवडत्या चिकन रेसिपी ने चॅनेल ची सुरुवात केलेली...(मी चिकन खात नसले तरी...😊😊) आणि आज पण मी माझ्या या प्रवासात माझी 100+ रेसिपी म्हणून माझ्या मुलाच्या आवडत्या चिकनचीच रेसिपी करत आहे...😊😊 कूकपॅड सोबत चा प्रवास खुपचं मस्त आहे, खास आभार, भाग्यश्री ताई चे जिने मला या ग्रुप मध्ये लॉकडाऊन सुरू असताना ऍड केले, आणि ज्या मुळे कोरोना वॉरीयर असून, सतत ड्युटी असून देखील अगदी बिझी शेड्यूल्ड मधून वेळात वेळ काढून मी माझ्या कूकिंग च्या आवडीला जपतेय... ,अंकिता मॅम, वर्षा मॅम आणि भक्तीचे ही खुप आभार, कारण तुमच्या कडून मिळणार प्रोत्साहन हे नेहमी सकारात्मक असतं... खूप छान आणि नवीन मैत्रिणी मिळाल्यात ज्या सतत आपल्या कलागुणांना वाव देत असतात, ज्या मुळे नेहमी काही न काही नवीन करण्याची प्रेरणा मिळते...😊 Shital Siddhesh Raut -
लखनवी चिकन फ्राय (Lucknowi Chicken Fry Recipe In Marathi)
#JPR'लखनवी चिकन फ्राय'बाहेर कोसळणारा मस्त पाऊस, आणि हातामध्ये गरमगरम चिकन लेगपीस कोणाला नाही आवडणार.... !! हा म्हणजे माझ्यासारख्या शुद्ध शाकाहारी लोकांचं सोडा पण शुद्ध मांसाहारी लोकांना नक्कीच आवडेल नाही का...😊 मी जरी शाकाहारी असले तरी मला परिवारासाठी मांसाहारी जेवण बनवावं लागतं, काय करणार मुलाची फर्माईश पूर्ण करावी लागते....!! Shital Siddhesh Raut -
पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi)
#GA4#week4#gravy# आमच्या घरी सर्वांची आवडती आणि रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर नेहेमीच ऑर्डर केली जाणारी डिश म्हणजे हीच पनीर बटर मसाला, तर मी आज ही डिश घरीच बनवली आहे, तर चला बघुयात कशाप्रकारे अगदी रेस्टॉरंट सारखी टेस्ट असणारी पनीर बटर मसाला ग्रेव्ही आपल्याला घरीच बनवता येईल Vaishu Gabhole -
झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#KGR#झटपट_चिकन_ग्रेव्हीचिकन अगदी झटपट आणि चविष्ट तयार करण्याची सोपी पद्धत पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
दहिवाली पनीर लसुनी ग्रेव्ही (dahiwala paneer lasuni gravy recipe in marathi)
#EB2#W2" दहिवाली पनीर लसुनी ग्रेव्ही " व्हेजिटेरीयन लोकांचा प्रोटीन सोर्स म्हणजे "पनीर"पनीर चे वेगवेगळे प्रकार आपण नेहमी करतो....!!पनीर ग्रेव्ही म्हटली,की ती राईस किंवा रोटी कशासोबत ही आरामात खाऊ शकतो.. म्हणून मी आज लसूण चा फ्लेवर आणि शाही अशी ग्रेव्ही बनवून त्यात पनीर ला ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या