स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी...

स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)

बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1-1/2 तास
2-3 लोक
  1. 200 ग्रॅमबोनलेस चिकन
  2. 2 टेबलस्पूनघट्ट दही (marination sathi)
  3. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  4. 5-6लसूण पाकळ्या
  5. 1/2 इंचआलं
  6. 1मोठा कांदा
  7. 3टोमॅटो
  8. 5-6काजू
  9. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  10. 2-3हिरवी विलायची
  11. 3-4काश्मिरी लाल मिरच्या/ तिखट
  12. 2-3 टेबलस्पूनबटर
  13. फोडणी साठी जिरं, हळद, तिखट व गरम मसाला, धणे पूड
  14. 1-2 टेबलस्पूनक्रिम(आवडीने)
  15. मीठ चवीनुसार
  16. 2-3 चमचेतेल फोडणी साठी
  17. बारीक चिरलेली कोथिंबीर
  18. 1 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

1-1/2 तास
  1. 1

    सर्व प्रथम चिकन मॅरीनेट करून घ्यावे. चिकन मध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट धणे पूड, गरम मसाला, मीठ व घट्ट दही घालून मिक्स करावे. 30 मिनिटं ठेवावे.

  2. 2

    आता एका कढईत जिरं, कांदा,लसूण पाकळ्या, आलं, काजू, काश्मिरी लाल मिरच्या,हिरव्या विलायची घालून परतून घ्यावे. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालून थोडे पाणी घालावे व 5-10 मिनिट मऊ शिजवून घ्यावे. मिश्रण गार करून मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करावी.गाळून घ्यावी.

  3. 3

    मॅरीनेटेड चिकन पॅन मध्ये बटर घालून सॉटे करून घ्यावे. स्मोकी फ्लेवर द्यायला पॅन मध्ये गरम कोळसा ठेवावा व 5 मिनिटं झाकण बंद करून ठेवावे.

  4. 4

    आता आपण ग्रेव्ही ची कृती बघूया. पॅन मध्ये तेल व बटर घालून बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा व कांदा टोमॅटो ची पेस्ट घालावी. हळद, तिखट धणे पूड व गरम मसाला घालून छान परतून घ्यावे.

  5. 5

    मीठ चवीनुसार, साखर, कसूरी मेथी व कोथिंबीर घालावी. सॉटेड चिकन घालून मिक्स करावे.

  6. 6

    परत स्मोकी फ्लेवर(ऐच्छिक) द्यायला पॅन मध्ये गरम कोळसा ठेवावा व त्यावर तेल घालून झाकण ठेवून एक वाफ आणावी. पराठा,नान,राईस कशाही सोबत बटर चिकन छान च लागतं. मी बटर गार्लिक नान व जिरा राईस सोबत सर्व्ह केलय..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes