कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#ccs
#कुकपॅडची शाळा सत्र दुसरे

"कच्छी दाबेली"
कुकपॅड मुळे मी फक्त नवनवीन रेसिपीज बनवायला नाही तर खायला ही शिकले आहे,असं म्हणायला हरकत नाही..
हो ना, दाबेली, पिझ्झा, बर्गर, पास्ता हे प्रकार मला अजिबात आवडत नव्हते..
पण आता स्वतः बनवते ,मग खाण्याची इच्छा होते.. आणि कच्छी दाबेली मस्त फ्लेवर फूल झाली होती.. पाव छान भरपूर बटर घालून क्रंची केले होते.. गरमागरम दाबेली खायला मजा आली..

कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)

#ccs
#कुकपॅडची शाळा सत्र दुसरे

"कच्छी दाबेली"
कुकपॅड मुळे मी फक्त नवनवीन रेसिपीज बनवायला नाही तर खायला ही शिकले आहे,असं म्हणायला हरकत नाही..
हो ना, दाबेली, पिझ्झा, बर्गर, पास्ता हे प्रकार मला अजिबात आवडत नव्हते..
पण आता स्वतः बनवते ,मग खाण्याची इच्छा होते.. आणि कच्छी दाबेली मस्त फ्लेवर फूल झाली होती.. पाव छान भरपूर बटर घालून क्रंची केले होते.. गरमागरम दाबेली खायला मजा आली..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
तीन
  1. 6पाव
  2. 4बटाटे
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  5. 2 टेबलस्पूनदाबेली मसाला
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. चवीनुसारमीठ
  9. 1/4 कपडाळिंब दाणे
  10. 1/4 कपखारे शेंगदाणे
  11. 2कांदे
  12. 1/4 कपकोथिंबीर
  13. 2हिरव्या मिरच्या
  14. 1/4 कपहिरवी चटणी
  15. 1/4 कपचिंच, खजूर गोड चटणी
  16. 100 ग्रॅमबटर

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    बटाटे कुकरमध्ये उकडून घ्या.. बाकीचे साहित्य एकत्र जमवून घ्या.. कांदा,कोथिंबीर, मिरची बारीक कापून घ्या..

  2. 2

    बटाटे सोलून स्मॅश करून घ्या.. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे घालून फुलले की लाल तिखट, हिरवी मिरची, दाबेली मसाला घालून चांगले परतून घ्या.. स्मॅश केलेला बटाटा, मीठ घालून मिक्स करा.पाव कप पाणी घालून भाजी छान दोन मिनिटे परतून घ्या..(पाणी टाकल्यामुळे भाजीला ओलसरपणा येतो, मिळून येते)

  3. 3

    तयार भाजी प्लेटमध्ये काढून त्यावर थोडा कांदा कोथिंबीर,खारे शेंगदाणे, डाळिंब दाणे घालावेत आणि ओल्या नारळाचा चव भुरभुरावे..

  4. 4

    भाजी तयार आहे आता पावांकडे वळुया. पाव मधोमध कट करून घ्या,एक बाजू तशीच ठेवायची आहे.. गॅसवर तवा तापत ठेवा व बटर घालून पाव आतुन छान भाजून घ्या..

  5. 5

    आता पावाला एक बाजूला हिरवी चटणी व दुसऱ्या बाजूला गोड चटणी लावून घ्या..त्यावर भाजी पसरवून घ्या..

  6. 6

    मग त्यावर कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, डाळिंब दाणे घालावेत.पाव बंद करून कडेने शेव लावून घ्या..व तव्यावर बटर घालून मस्त दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या..

  7. 7
  8. 8

    गरमागरम होममेड कच्छी दाबेली तयार आहे.. वरून शेव, कोथिंबीर, शेंगदाणे, डाळिंब दाणे घालून सर्व्ह करा..

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes