दाबेली (dabeli recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#मकर
# दाबेली, डबल रोटी..... गुजरात फेमस
गुजरात मध्ये उतरण चे खूप महत्त्व आहे उतरण (संक्रांत) च्यावेळेस पतंगी खूप मोठ्या प्रमाणात उडवली जात असते त्यावेळेस पूर्ण दिवस काही न काही स्नॅक्स म्हणून आपल्याला घ्यायला पाहिजे असेल तर दाबेली पण बनवली जाते...

दाबेली (dabeli recipe in marathi)

#मकर
# दाबेली, डबल रोटी..... गुजरात फेमस
गुजरात मध्ये उतरण चे खूप महत्त्व आहे उतरण (संक्रांत) च्यावेळेस पतंगी खूप मोठ्या प्रमाणात उडवली जात असते त्यावेळेस पूर्ण दिवस काही न काही स्नॅक्स म्हणून आपल्याला घ्यायला पाहिजे असेल तर दाबेली पण बनवली जाते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
4 व्यक्ती
  1. 4कच्ची केळी शिजलेली
  2. 2 टीस्पूनतेल
  3. 2 टेबलस्पूनदाबेली मसाला
  4. मसाला सिंग आवडीप्रमाणे
  5. डाळिंब, बारीक शेव, कांदा आवडीप्रमाणे
  6. लसणाची लाल चटणी
  7. चिंच खजुराची गोड चटणी
  8. मसाले शेंगदाणे बनवण्यासाठी
  9. 1 कपशेंगदाणे
  10. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  11. 1/4 टीस्पूनधने-जिरेपूड
  12. 1/4 टीस्पूनचाट मसाला

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1
  2. 2

    सर्वात प्रथम केळी ही कुकरमध्ये 4 शिट्टी घेऊन शिजवून घ्या आणि मॅशरने मॅश करून घ्या. कढाई गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल टाका दाबेली मसाला हा एका वाटीमध्ये थोडे पाणी टाकून पण मिक्स करून घ्या

  3. 3

    ते गरम झाल्यावर त्यामध्ये दाबेली मसाला टाका आणि मिक्स करून घ्या नंतर कच्ची केळीचे सारण टाकून मिक्स करा

  4. 4

    दुसऱ्या एका कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून शेकून घ्या गुलाबी रंगाचे शेकल्यावर थंड होऊ द्या त्यानंतर त्याचे साल काढून घ्या.

  5. 5

    पुन्हा कढईमध्ये टाकून थोडे तेल टाका आणि व्यवस्थित फ्राय करून घ्या त्यामध्ये लाल तिखट धनेजिरे पूड थोडा चाट मसाला टाकून नीट करून घ्या

  6. 6

    लादी पावला मधून चाकूने दोन भाग करा एका बाजूला गोड चटणी एका बाजूला लाल चटणी लावा मध्यभागी कच्चा केळी चे सारण ठेवा वरून शेंगदाणे, डाळिंब, बारीक शेव, कांदा थोडीशी कोथिंबीर हे सर्व ठेवून लादीपाव बंद करून घ्या तवा गरम करायला ठेवा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तूप टाका आणि लादीपाव हे व्यवस्थित दोन्ही बाजूंनी शेकून घ्या

  7. 7

    मस्तपैकी दाबेली तयार झालेली आहे

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या (2)

Navnath_P_ Kedari_5757
Navnath_P_ Kedari_5757 @Navnath5757
गुजरात मधील कच्छ मध्ये दाबेली मसाला तयार करण्यात येतो ना त्याची recipe sanga minimum 500 gram करता आला पाहिजे

Similar Recipes