कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#ccs
कूकपॅडची शाळा हे चॅलेंज 2 रे .
शब्द कोडी यातील मी कच्छी दाबेली ही रेसिपी केली आहे.

कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)

#ccs
कूकपॅडची शाळा हे चॅलेंज 2 रे .
शब्द कोडी यातील मी कच्छी दाबेली ही रेसिपी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
5-6 जणांसाठी
  1. 10-12दाबेली पाव
  2. 3मध्यम आकाराचे बटाटे
  3. 3-4 टेबलस्पूनकच्छी दाबेली मसाला. तिखट हवी असल्यास अजून घालणे
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. थोडी कोथिंबीर
  6. 2 टेबलस्पूनमसाला शेेंगदाणे
  7. 2-3 टेबलस्पूनडाळिंबाचे दाणे
  8. 1 लहानकांदा
  9. 1/4 कपबारीक पिवळी शेव
  10. 1/2 कपचिंचेची चटणी
  11. थोडे अमूल बटर

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    बटाटे उकडून घ्यावेत. त्याची साले काढून कुस्करुन घेणे.सर्व साहित्य जमवणे.कांदा बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की दाबेली मसाला घालून परतवून घेणे.लगेच कुस्करलेला बटाटा घालून मिक्स करून घेणे व झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी.गॅस बंद करावा. भाजी ताटलीत काढून थंड होऊ द्यावी.

  3. 3

    थंड झाल्यावर त्यात डाळिंबाचे दाणे,मसाला शेंगदाणे,बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून मिक्स करून घेणे.

  4. 4

    पाव मध्यभागी सुरीने कापून घेणे. एक बाजू जोडलेली तशीच ठेवावी.त्याला दोन्ही बाजूंनी चिंचेची चटणी लावून घेणे.थोडी भाजी पसरवून घेणे.वरचा भाग त्यावर ठेवून थोडे दाबणे. अशाप्रकारे सर्व दाबेली तयार करून घेणे.

  5. 5

    गॅसवर तवा तापत ठेवावा. तवा तापल्यावर मंद आचेवर ठेवून बटर लावून घेणे. तयार दाबेली त्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी थोडेसे भाजून घेणे.

  6. 6

    तयार दाबेलीला सर्व बाजूंनी चिंचेची चटणी लावून घेणे. शेवेमध्ये घोळवून घेणे. खाण्यासाठी तयार कच्छी दाबेली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes