शिंगाड्याचे थालीपीठ (shingadyache thalipeeth recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#nrr 9 रात्री जल्लोष
नवरात्री उत्सवनिमित्ताने सातव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड 'शिंगाडा'आहे. त्यानिमित्ताने शिंगाडा पिठाचे थालीपीठ बनविले. छान झाले. प्रत्येक वेळी नेहमीच्याच उपवास रेसिपी खाण्याची इच्छा नसते. अश्यावेळी काहीतरी बदल म्हणून हे "शिंगाडा पिठाचे थालीपीठ " उत्तम पर्याय आहे. 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 लोकांकरिता
  1. 1 वाटीशिंगाडा पीठ
  2. 1बटाटा
  3. 3 टेबलस्पूनशेंगदाण्याचे कुट
  4. 1 टेबलस्पूनसाखर
  5. 3-4हिरव्या मिरच्या क्रश केलेल्या
  6. चवीनुसारमीठ
  7. आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाट्याची साल काढून खिसून घ्यावा. शिंगाड्याचे पीठ चाळून घ्यावे. मिरच्या मिक्सरला क्रश करून घ्याव्यात.दही, साखर मीठ सर्व साहित्य घ्यावे.

  2. 2

    पीठात खिसलेला बटाटा, क्रश केलेल्या मिरच्या, साखर, दही व चवीनुसार मीठ घालून पिठाचा गोळा करावा. दहा मिनिटे पीठ भिजू द्यावे. त्यानंतर छोटे गोळे करून घ्यावेत.

  3. 3

    सुती कपड्यावर थालीपीठ थापून घ्यावे. गॅसवर तवा गरम करून त्यावर तूप लावावे व थालीपीठ घालावे. थालीपीठ भोवती तूप सोडून झाकणीने झाकावे. एक वाफ काढावी.

  4. 4

    दोन्हीबाजूने थालीपीठ खरपूस भाजावे. भाजलेले हे थालीपीठ दह्याबरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

Similar Recipes