पाकातले रवा लाडू (rava laddu recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#dfr
#दिवाळी_ फराळ_ चँलेंज

#पाकातले रवा लाडू...

दिवाळी फराळमध्ये गोड ,तिखट,खमंग खुसखुशीत, चमचमीत फराळाची नुसती रेलचेल असते..गोड पदार्थांमध्ये लाडूचेच किती प्रकार केले जातात..यापैकी पाकातले रवा लाडू करताना गृहिणींचा खरा कस लागतो..पाकावरच लाडवाचं सगळं यशापयश अवलंबून असते..पाक जमला की शंभर टक्के लढाई जिंकलीच म्हणून समजा.😀पाकाची
ची खूप calculations असतात.ती step by step सोडवावी लागतात..तरच end product ला marks मिळतात.म्हणून पाकाला बिघडू न देता त्यावर बारीक नजर ठेवावी लागते...😀
चला तर दिवाळीमध्ये हमखास केल्या जाणार्या या लाडवांची रेसिपी बघू या...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनीटे
4 जणांना
  1. 1 कपबारीक रवा
  2. 1/2 कपखवलेला ओला नारळ
  3. 1/2 कपसाजूक तूप
  4. 2 टीस्पूनवेलचीपूड
  5. 1/2 कपपाणी
  6. 3/4 कपसाखर
  7. बेदाणे किंवा पिस्ते वरून लावण्यासाठी

कुकिंग सूचना

30-40 मिनीटे
  1. 1

    प्रथम नारळ खरवडून घ्या. आता गॅसवर कढई मध्ये तूप गरम करून त्यात रवा गुलाबीसर भाजून घ्या. रवा भाजत आल्यावर त्यात नारळाचा चव घालून मंद आचेवर पुन्हा सात ते आठ मिनीटे परतून घ्या.

  2. 2
  3. 3

    एकीकडे गॅसवर कढई मध्ये साखर व साखरेच्या निम्मे पाणी घालून त्याचा एक तारी पेक्षा थोडा वरचा पाक करून घेतला. पाकाला उकळी आल्यावर त्यात १ चमचा दूध घालून उकळले व वर येणारी साखरेतली मळी काढून घ्या.(पाकला उकळी येण्यास सुरवात होते. साधारण पाकाला चिकटपणा,एक तार आली की समजावे पाक तयार आहे. आता गॅस बंद करावा.(एखादा थेंब प्लेट मध्ये घालून पाहावे कि तो थेंब एकाच ठिकाणी राहिला तर पाक झाला असे समजावे)नसेल तर पुन्हा गॅस सुरु करुन पाक उकळावा.

  4. 4
  5. 5

    आता तयार पाकात रव्याचे मिश्रण घालून मिक्स करुन घ्या.
    वेलचीपूड घालाव साधारण अर्धा ते एक तास झाकून ठेवा. रवा पाकात मुरवून मिश्रण घट्ट झाल्यावर मग त्यात बेदाणे लावून वळून घ्या..

  6. 6
  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes