रवा लाडू नारळ घालून (rava laddoo naral ghalun recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#diwali21
#कधी पासून कुकपॅड मधे रवा लाडू करायचे होते पण मुहूर्त लागत नव्हता. माझ्या मुलांना अत्यंत प्रिय असे हे माझ्या हातचे लाडू. मुलगी ऑस्ट्रेलियात आहे तिची आठवण काढत खावे लागणार.खुप छान होतात हे लाडू अवश्य करून पहा आमच्या घरी सर्वाना प्रिय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिटे
4/5 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपरवा
  2. 1.5 कपसाखर
  3. 1 कपनारळ खवलेला
  4. 1 टीस्पूनवेलचीपुड
  5. 3/4 कपपाणी
  6. 2/3 टेबलस्पूनतुप
  7. 25मनुका नि 15.पिस्ता सजावटीसाठी

कुकिंग सूचना

40मिनिटे
  1. 1

    खालील प्रमाणे तयारी करावी. रवा नि साखर मापून घ्या.पिस्ता कापून घ्या.

  2. 2

    रवा अगोदर 10 मिनिटे मध्यम आचेवर कोरडा भाजा नि नंतर त्यात 2 टेबलस्पून तुप घालून भाजून 10मिनिटे भाजून घ्या.बाजूला ठेवा.आता त्याच कढईत 1टेबलस्पून तुप टाकून नारळ 5/7 मिनिटे परता म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल. भाजलेले खोबरे व रवा मिसळून ठेवा.

  3. 3

    गॅसवर कढईत साखर घालून त्यात 1/2 कप पाणी घाला.आपणास साखरेचा एक तारी पाक करायचा आहे साधारण 10/15 मिनीटात पाक तयार होतो.

  4. 4

    पाक तयार झाला आहे त्यात वेलचीपुड घाला नि रवा खोबर्याचे मिश्रण 1ते 2तास तसेच ठेवा.

  5. 5

    आता लाडू करून घ्या लाडवांना मनुका पिस्ता लावा.

  6. 6

    खमंग रव्याचे नारळ घातलेले लाडू तयार आहेत.चार पाच दिवसात संपवा नाही तर खवट होतील.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes