हुलग्याचे शेंगोळे (hulgyache shengole recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#HLR
ना रुप...ना रंग...तरीही पौष्टिक!
हुलगे म्हणजेच कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हल्के असतात. ते शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात व कफ दोष कमी करतात. खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करतात. कुळीथ अंगातील ताप कमी करते.थंडीत उष्णता वाढवणारे आणि ताकद देणारे अत्यंत पौष्टिक असे कडधान्य म्हणून कुळथाचे सेवन केले जाते. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्तींना देण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात, पितप्रकृतीच्या माणसांनी मात्र  कुळीथ खाऊ नये.शेंगोळी हा माझ्याकडे दर थंडीत 4-5वेळा तरी होणारा अतिशय आवडता पदार्थ!चला तर घ्या आस्वाद.....शेंगोळ्यांचा😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4-5व्यक्ती
  1. 1/2 किलोहुलगे अथवा कुळीथाचे पीठ
  2. 1मोठा गड्डा लसणाच्या पाकळ्या
  3. 5-6हिरव्या मिरच्या
  4. 2 टीस्पूनमीठ शेंगोळ्याचे पीठ भिजवण्यासाठी
  5. 5-6 कपपाणी
  6. 3 टेबलस्पूनतेल
  7. फोडणीसाठी मोहरी,हिंग, हळद
  8. 2 टीस्पूनगोडा मसाला
  9. 1 टीस्पूनतिखट
  10. 1 टीस्पूनमीठ (पाणी उकळताना घालण्यास)
  11. 2 टेबलस्पूनकोथींबीर

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    हुलगे दळून बारीक पीठ करावे.हे पीठ खूप मऊ असते.वरील प्रमाणानुसार पीठ घ्यावे.त्यात लसूणपाकळ्या व मिरच्या मिक्सरमधून पेस्ट करुन घालाव्या.मीठ व थोडे तेल घालावे.थंड पाण्याने पीठ घट्ट भिजवावे.अर्धा तास भिजू द्यावे.

  2. 2

    आता या पीठाची छोटी गोळी करावी. आपण कडबोळ्यासाठी जसे पीठ वळतो तसे या पीठाची शेंगोळे वळावेत.स्टीक्स,कडबोळी किंवा चकलीच्या आकारात करु शकता.सर्व पीठाचे असे शेंगोळे वळुन ताटात ठेवावेत.थोडा पीठाचा गोळा उकळीच्या पाण्याला लावण्यासाठी ठेवावा.याने पाण्यास चव व घट्टपणा येतो.

  3. 3

    गँसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालून फोडणी करावी. यात पाणी घालावे व उकळी येऊ द्यावी.ठेवलेला पीठाचा छोटासा गोळा घालावा.पाण्याला थोडा घट्टपणा येईल.या पाण्यात मसाला,तिखट,मीठ घालावे व उकळावे.आता एकेक वळलेली शेंगोळी या पाण्यात घालावी व शिजू द्यावे. शेंगोळे शिजण्यास 15-20 मिनिटे लागतात.

  4. 4

    थंडीमध्ये अतिशय पौष्टिक असे हे गरमागरम शेंगोळे थोडी कोथिंबीर गार्निश करुन भाताबरोबर,भाकरीबरोबर सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes