पारंपारिक पद्धतीने कुळीथाचे शेंगोळे (shengole recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#KS7
#लाॅस्ट रेसिपीज

"पारंपारिक पद्धतीने कुळीथाचे शेंगोळे"

आमच्या कडे याला हुलगे असे म्हणतात..हुलग्याच्या पीठापासुन बनवलेली ही रेसिपी खुप छान लागते पण हल्ली जास्त बनवली जात नाही आणि मेन कारण बऱ्याच जणांना ही बनवता येत नाही.कारण दोन्ही तळहातावर पीठ घेऊन वळतात.. मस्त गोलाकार वेढे करतात पण ते सगळ्यांनाच जमत नाही, मला सुद्धा नाही जमत.पण यावर मी छान उपाय काढला आहे आणि तो यशस्वी झाला आहे.त्यामुळे मी या पद्धतीने च करते.. चला तर मग माझी पद्धत दाखवते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार पाच
  1. 2 कपकुळीथ पीठ
  2. 2 -3 टेबलस्पूनलाल तिखट आवडीनुसार
  3. 10-12लसणाच्या पाकळ्या
  4. चवीनुसारमीठ
  5. 3 टेबलस्पूनतेल
  6. 1 टेबलस्पूनजीरे

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    कुळीथ पीठ वाटी मध्ये काढून घ्या.. लसूण, लाल तिखट, मीठ, जीरे एकत्र बारीक वाटून घ्या.

  2. 2

    वाटलेले मिश्रण पीठामध्ये मिक्स करून घ्या आणि लागेल तसे पाणी घालून पीठाचा गोळा करून घ्या

  3. 3

    पाच मिनिटे पीठ भिजू द्या मग शेंगोळे बनवण्यासाठी साच्याच्या (चकली शेव बनवण्याचे तंत्र) वापर करा.. जाडसर शेव ची प्लेट साच्यामध्ये घालून आतुन तेल लावून घ्या साच्याला आणि पीठ घालून शेंगोळे बनवुन घ्या..

  4. 4

    तोपर्यंत गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात जीरे हिंग घालून फोडणी करा आणि पाणी घालून उकळत ठेवा..पाणी उकळेपर्यंत पाच सहा शेंगोळ्यांचे वेढे बनवुन घ्या,मग उकळत्या पाण्यात शिजण्यासाठी सोडा.. पाच मिनिटांनी उरलेले शेंगोळे सोडा..

  5. 5

    पीठ थोडे शिल्लक ठेवुन त्यात पाणी घालून बॅटर बनवा व ते शेंगोळीमध्ये ओता.. शिजण्यासाठी अंदाजे दोन कप गरम पाणी घाला व मिडीयम गॅसवर पंधरा मिनिटे शिजू द्या..

  6. 6

    मस्त गरमागरम शेंगोळी चपाती, भाकरी सोबत किंवा अशीच खाऊ शकता.. प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या (2)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
मला खूप आवडते. माझा घरी मी नेहमी करते, उन्हाळा सोडून, कुळीथ गरम असतात, 👍👍

Similar Recipes