कच्च्या पपईची भाजी (kachya papaya chi bhaji recipe in marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

पिकलेली पपई आपण नेहमीच खातो.शरीरासाठी तसंच त्वचेसाठी खुप गुणकारक असते.

कच्च्या पपईची भाजी (kachya papaya chi bhaji recipe in marathi)

पिकलेली पपई आपण नेहमीच खातो.शरीरासाठी तसंच त्वचेसाठी खुप गुणकारक असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार
  1. थोङीशी पिकायला सुरवात झालेली पण कच्ची पपई
  2. 2कांदे कापुन
  3. 4हीरव्या मिरच्या उभ्या कापुन
  4. ओलं खोबरं
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. मीठ
  7. 1 टेबलस्पूनगुळ
  8. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  9. गरजेप्रमाणे
  10. फोङणीसाठी
  11. तेल
  12. 1 टेबलस्पूनमोहरी
  13. कङीपत्ता दहा पानं

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    पपई चं सालं काढून आवङीप्रमाणे कापुन घ्यावी नंतर पाण्यात ठेवावी.

  2. 2

    कांदा,मिरच्या कापुन घ्याव्या व कढईत तेल गरम करुन मोहरी,कङीपत्ता व मिरच्या परतुन घ्याव्यात.

  3. 3

    कांदा तांबूस झाल्यावर हळद घालुन परतुन मग पपई घालावी व मग गरजेप्रमाणे मीठ घालुन मंद गॅसवर दहा मिनिटे झाकणीवर पाणी घालुन ठेवावे.

  4. 4

    दहा मिनीटा नंतर भाजीत गुळ,खोबरं,गरम मसाला टाकून परतुन घ्या. परत दोन मिनिटं झाकुन ठेवा.झाली तयार मस्त भाजी.
    टीप:-हीच भाजी सुका जवळा टाकुन पण खुप छान लागते.कांद्यावर भाजीच्या आधी स्वच्छ धुऊन जवळा परतुन मग भाजी घालावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

Similar Recipes