व्हेज स्टफ्ड पराठा (veg stuffed paratha recipe in marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

पराठा हा प्रकार उत्तर भारतातील जगप्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे आणि सर्व खवय्यांची आवडती डिश आहे.
गाजर आणि बटाटा वापरून तयार केलेला हा पराठा तुम्ही नक्की करून पहा.

व्हेज स्टफ्ड पराठा (veg stuffed paratha recipe in marathi)

पराठा हा प्रकार उत्तर भारतातील जगप्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे आणि सर्व खवय्यांची आवडती डिश आहे.
गाजर आणि बटाटा वापरून तयार केलेला हा पराठा तुम्ही नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 लोक
  1. 250 ग्रॅमबटाटे
  2. 250 ग्रॅमगव्हाचे पीठ
  3. 4-5 गाजर
  4. 2 चमचेकसुरी मेथी
  5. 1 चमचाआमचूर पावडर
  6. 1 चमचातिखट
  7. 1 चमचाप्रत्येकी हळद, धने जीरे पूड
  8. 1 चमचाशाही जीरे आणि बडीशेप पावडर
  9. 4 चमचेबटर
  10. 4 चमचेतांदळाची पिठी

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    गव्हाच्या पीठात मीठ आणि थोडे तेल घालून मळून घ्यावे.

  2. 2

    उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून त्याचे सारण तयार करावे.

  3. 3

    कणकेची पारी तयार करून त्यामध्ये सारण भरून उंडा तयार करून घ्यावा.

  4. 4

    पोळपाटावर तांदळाची पिठी घालून पराठा लाटून घ्यावा.

  5. 5

    तांदळाच्या पिठात घोळवून पराठा केला तर वरून खुसखुशीत होतो.

  6. 6

    तव्यावर बटर घालून भाजून घ्यावे.

  7. 7

    दोन्ही बाजूंनी बटर सोडून खरपूस भाजून घ्यावा.

  8. 8

    गरमागरम पराठा दही किंवा साॅस‌बरोबर‌ सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

Similar Recipes