मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#EB1 #W1
बहुगुणी मेथी...हिवाळ्याची चाहूल लागताच मंडईत दिसू लागतात हिरव्याकंच पालेभाज्या. त्यातली सगळ्यात अग्रणी म्हणजे मेथी.अतिशय पौष्टिक, चवीला थोडी कडू असली तरीही मेथी खाण्याचे खूपच फायदे आहेत.यात आयर्न,कँल्शियम,व्हिटॅमिन के,फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात.कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित राखणे आणि रक्तातील साखर नियंत्रित राखणे ही दोन महत्वाची कार्य मेथी करते.थंडीमध्ये तर पाचनक्रिया उत्तम काम करण्यासाठी मेथी खाल्ली जाते.मेथीच्या पानांबरोबरच मेथीदाणेही खाल्ल्याने स्नायूंना बळकटी येते.यासाठीच प्रसुतीनंतर मेथीची भाजी,मेथ्यांचे लाडू खाणे हितकर ठरते. पावसाळ्यात मिळणारी कोवळी छोटी मेथीही अशीच वातहारक आणि बलदायी.अगदी कशाही रुपात ही मेथी भाव खाऊन जाते.मेथीचे वरण,डाळमेथ्या,मेथीची परतून केलेली भाजी,कधी पीठ पेरुन तर कधी पातळ भाजीवर मस्त चुरचुरीत लसणाची फोडणी घालून .....अशी विविध प्रकारे केलेली भाजी आणि गरम भाकरी म्हणजे केवळ सुख!!मेथीचे ठेपले,पराठे हा सुद्धा खूप आवडता प्रकार...आणि 2 दिवस सहज टिकणारा.मेथीचे तळलेले मुटके मात्र उंधियोमध्येच अफलातून लागतात.सगळ्या भाज्यांबरोबर आलेला हा मेथीचा मुटका उंधियोची सॉलिड रंगत वाढवतो....तर अशी बहुगुणी आणि अनेकविध प्रकारे आहारात घेतली जाणारी ही मेथी थंडीची मजा आणिकच वाढवते.😋😋
☘️🌱☘️🌱🍀🌱☘️🌱☘️🌱☘️🌱☘️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिटे
5व्यक्ती
  1. 6 डावकणिक
  2. 1 डावडाळीचे पीठ
  3. 2 कपनिवडून,धुवून घेतलेली मेथी बारीक चिरून
  4. 3 टेबलस्पूनतेल
  5. 2 टीस्पूनमीठ
  6. 2 टीस्पूनगरम मसाला
  7. 2 टीस्पूनधणेजीरे पूड
  8. 10-15लसुणपाकळ्या
  9. 5-6हिरव्या मिरच्या
  10. 1 टीस्पूनओवा
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनतीळ

कुकिंग सूचना

40मिनिटे
  1. 1

    मेथी निवडताना फक्त पाने घ्यावीत.नंतर स्वच्छ धुवून बारीक चिरावी.लसुण-मिरची पेस्ट करुन ठेवावी. कणकेमध्ये तेल, डाळीचे पीठ,चिरलेली मेथी,मीठ चवीनुसार, लसुण मिरची पेस्ट,तीळ,ओवा,हळद,गरम मसाला व धणेजीरे पूड घालून थंड पाण्याने घट्ट भिजवावे. भिजवलेले पीठ अर्धातास भिजू द्यावे.

  2. 2

    पोळीला घेतो त्यापेक्षा थोडा छोटा गोळा घेऊन पराठा पोळपाटावर थोडे पीठ भुरभुरून लाटावा.गरम तव्यावर पराठा चमचाभर तेल घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावा.

  3. 3

    पौष्टिक आणि पोटभरीचा गरमागरम पराठा लोणी,दही,एखादी चटणी,छुंदा याबरोबर सर्व्ह करावा.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes