कैरीचे पन्हे (Kairiche Panhe Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज कैरीचे पन्हे ही रेसिपी पोस्ट करत आहे.

कैरीचे पन्हे (Kairiche Panhe Recipe In Marathi)

#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज कैरीचे पन्हे ही रेसिपी पोस्ट करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन
  1. 250 ग्रॅमकैऱ्या
  2. 250 ग्रॅमगूळ
  3. 50 ग्रॅमसाखर, वेलची पावडर
  4. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुऊन, कूकरच्या भांड्यात घेऊन त्यात पाणी घालून शिजवून घेतल्या.

  2. 2

    कूकर थंड झाल्यावर, त्यातील कैऱ्या काढून, त्याची साल काढून घेतली.

  3. 3

    मग सर्व कैऱ्याचा गर काढून एकत्र करून घेतला. तसेच कैरीच्या कोयीला असलेला गर काढून, कोय टाकून दयावी. आणि सर्व गर एकत्र करून त्यात साखर व गूळ किसून घातला, व मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतला.

  4. 4

    नंतर त्यात वेलची पावडर घालून चांगले मिक्स करून काचेच्या बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवावे. व जेव्हा आपल्याला हवे असेल तेव्हा बरणी मधून पन्हे काढून त्यात थंड पाणी घालून चांगले ढवळावे.

  5. 5

    आणि उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर, थंड पाणी घेऊन त्यात थंडगार पन्हे घालून ते चांगले ढवळून पिऊ शकतो. तसेच आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आपण सर्व्ह करू शकतो, थंडगार कैरीचे पन्हे. उन्हाळ्यात हवा खूप गरम असते, त्यामुळे पन्हं प्यायलयामुळे खूप छान वाटते. शिवाय उन्हाचा त्रास सुद्धा खूप कमी होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
धन्यवाद आर्या ताई, दिपा ताई.

Similar Recipes