कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#Kkr
कैरीचे पन्हे हे उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक सर्वांचे आवडते पेय आहे. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे पन्हे उन्हाळ्यात तुम्हाला उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करते
उन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच कैरीचीही आवक सुरू होते आणि त्याच्या स्वादिष्ट पदार्थांचा हंगामही सुरू होतो. चटणी व्यतिरिक्त, कैरीच्या सर्वात स्वादिष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे कैरीचे पन्हे. हे केवळ चवीनुसारच नाही तर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि इतर आरोग्य फायदे मिळवण्यासाठी देखील उत्तम आहे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून वाचवते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 ते तीन कैर्‍या/कच्चे आंबे
  2. 1 वाटीकिसलेले गुळ
  3. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  4. दोन -तीनकेशरच्य काड्या
  5. पाणी
  6. किंचितमीठ
  7. तुकडेआईस क्यूब/बर्फाचे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कैरी घेवून स्वच्छ धुऊन घ्यावी कुकर मध्ये पाणी घालून त्यावर कुकरचा डब्बा किंवा भांडे ठेवावे त्यात कैरी घालून वाफेवर शिजवून घ्यावे

  2. 2

    कैरी शिजली की थंड झाल्यावर त्याचे साल काढून गर काढून घ्यावा

  3. 3

    गुळ किसून घ्यावा

  4. 4

    आता कैरीचा गर, गुळ केशराच्या काड्या सर्व मिक्सर मध्ये घालून बारीक करून घ्यावे

  5. 5

    आता हे मिश्रण एकत्र मिक्स करावे हे मिश्रण काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवावे फार दिवस टिकते

  6. 6

    आता पन्हे बनविताना वरील मिश्रण ज्या ग्लास मध्ये सर्व्ह करायचे आहे त्यात एक ते दोन चमचे घालावे थंड पाणी घालून घ्यावे वरून बर्फाचे तुकडे/ आईस क्यूब घालावे

  7. 7

    थंडगार पन्हे तयार

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes