मँगोआईस्क्रीम शेक (Mango Ice Cream Shake Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#SSR
उन्हाळा ठंडा ठंडा...कूल कूल बनवायचा म्हणलं की अनेक ऑप्शन उभे रहातात.यात दररोज काहीतरी वेगळं हवं!अगदी लिंबू सरबत,कोकम सरबत,काही तयार सरबतं,कधी ज्यूस तर कधी थंडगार पन्हं,कुल्फी,आईस्क्रीम, स्मूदीज...हे सगळं अधूनमधून तयार ठेवावंच लागतं!बर्फ आणि थंडगार असं वाळा असलेलं माठातलं पाणी ही पाणपोई तर घरात अखंड चालू असते.आलेल्या पाहुण्यालाही चटकन पुढे करता येणारं थंडगार असं काहीतरी तयार ठेवलं की बरं पडतं.मग कधी दुपारी कलिंगड तर कधी खरबूज चिरायला हवंच!
हा सगळा आटापिटा शरीरातील कमी होणारे क्षार भरून काढण्यासाठी!उन्हाळ्यात घामावाटे भरपूर क्षार बाहेर जात असतात.शरीराचा समतोल राखण्यासाठी या क्षारांची आवश्यकता असते.मीठ,साखर आणि फळांबरोबर हा समतोल राखला जातो.हल्ली बाराही महिने आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स सगळ्यांना चालतात आणि आवडतातही.अगदी भर कडाक्याच्या थंडीतही कार्यक्रमात आईस्क्रीम ठेवलेलं बघितलं आहे.त्यामुळे उन्हाळा आणि काहीतरी थंड असं राहिलं नसून केव्हाही हे आवडीने खाल्लं जातं.
आजचा मँगो आईस्क्रीम शेक विथ मँगोपीसेस असंच जेवणानंतर घेण्यासाठी खास बनवलाय....😊😋या तर... 🙋🍹

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
5 व्यक्ती
  1. 1 लीटरमँगो आईस्क्रीम फँमिली पँक
  2. 1/2 लीटरदूध न तापवता
  3. 2हापूस आंबे - रस काढून
  4. 1हापूस आंबा फोडी करुन
  5. 6 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    तयार आंबा आइस्क्रीम येथे घेतले आहे.दूध फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावे.न तापवताच नीरसं दूध वापरावे.प्रथम दूध मिक्सरमध्ये घालावे त्यात सर्व आईस्क्रीम घालावे.

  2. 2

    दोन आंब्याचा रस काढून यात घालावा.एका आंब्याच्या फोडी करुन बाजूला ठेवाव्यात.या शेकमध्ये गार्निशींगसाठी घालाव्यात.
    साखर घालून सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे.एका बाऊलमध्ये काढून फ्रीजमध्ये 1/2ते1तास थंड होण्यास ठेवावे.

  3. 3

    मँगो आईस्क्रीम शेक तयार आहे.सर्व्ह करताना यावर आंब्याच्या फोडी घालाव्यात व थंडगार शेक सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes