उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#LOR
स्वयंपाकातले पदार्थ उरणं आणि उरले तर संपवणं यातून गृहिणीचं कसब सिद्ध होतं.अन्नाचा एकेक कण पिकवण्यापासून ते त्यासाठी कष्ट करुन घरात आणेपर्यंत मोठा प्रवास आहे.त्याची जाणिव स्वयंपाक करणाऱ्याला ठेवावीच लागते.अन्न वाया जाण्याइतके बनवायचेच नाही,त्यातूनही कधीतरी काहीतरी कारणाने केलेला पदार्थ उरतोच.कधी साधं गरम करुन दुसऱ्या दिवशी वाढून घेता येतो.तरीसुद्धा अगदी दुपारच्या जेवणात असे शिळे खाणे टाळलेलेच बरे!साधारण पाच तासांनंतर पदार्थ शिळा होतो.सकाळचे संध्याकाळी खाणे हे सुद्धा शिळेच.त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी दोन्हीवेळा ताजे खाणे हेच खरं तर अंगी लागते.पण वेळेअभावी एकदाच दोन्ही वेळचा सगळा स्वयंपाक केला जातो.घरातल्या प्रत्येकाच्या तब्येती व रुटीन वेगवेगळे असते,त्यामुळे उराउरी झाली तरी सकाळी नाश्त्याच्या वेळीच असे उरलेले पदार्थ संपवणे हितकर ठरते.शिळे वरण,आमटी,पालेभाज्या घालून पराठे,थालिपीठं, मुटके करता येतात.फोडणीचा भात,उरलेल्या पोळ्यांची फोडणीची पोळी करता येते.शिळ्या भाकरीची दही-भाकरी फोडणी घालून मस्त लागते.फ्रीजमधे अन्न ठेवले तरी ते फक्त खराब होत नाही,पण त्यातली पोषणतत्वे गेलेलीच असतात.काहींना खूप दिवसांचे फ्रीजमधले उरलेले संपवायची सवय असते.पण यातूनही स्थूलपणा,पोटाचे विकार उद्भवू शकतात."उदरभरण नोहे।जाणिजे यज्ञकर्म"म्हणजे जेवणे हे फक्त पोट भरण्यासाठी नसावे तर एखाद्या यज्ञात जशी आहुती देतात व अग्नी प्रज्वलित होतो तसे ताजे व उत्तम दर्जाचे अन्न सेवन करावे.
आज माझ्याकडेही भरपूर साधा भात उरला.फोडणीचा,फ्राईड असा कोणताही भात खायचा नव्हता,आज शक्कल लढवून तोच भात मेदूवड्याच्या रुपात घरच्यांना पेश केला...किती आवडीने खाल्ला म्हणून सांगू!चला..तुम्हीही हे मेदूवडे या टेस्ट करायला😊😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 मोठा वाटी मोठा वाटी उरलेला शिळा भात
  2. 1.5 कपबारीक रवा
  3. 1.5 कपतांदूळ पीठी
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1 टीस्पूनमीरेपूड
  6. 1 टीस्पूनओवा
  7. 1 टीस्पूनकिचनकिंग मसाला
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1.5 टीस्पूनबारीक चिरलेल्या मिरच्या
  10. 1/4 वाटीचिरलेली कोथिंबीर
  11. 2 टीस्पूनमीठ किंवा मीठ आवडीनुसार
  12. 1/2 वाटीपाणी
  13. 2-3 टेबलस्पूनतेल वडे थापण्यास
  14. 1/4कि.रिफाइंड तेल-वडे तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    भाताचे मेदूवडे तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य वरीलप्रमाणे घ्यावे. आता शिळा भात मिक्सरमध्ये घालावा. त्यात पाणी घालून अगदी मऊ पेस्ट होईपर्यंत बारीक करावा.

  2. 2
  3. 3

    या भाताच्या पेस्टमध्ये रवा व तांदूळ पीठी घालावी.त्यावर किचनकिंग मसाला, मीरेपूड,जीरे,ओवा,बारीक चिरलेली कोथिंबीर व मिरच्या आणि मीठ घालावे.

  4. 4

    पीठ हाताने किंवा डावाने सारखे करुन घ्यावे.पीठाची थोडी चव पाहून जरुरीप्रमाणे तिखट,मीठ घालावे.वरुन थोडे तेल घालून पीठ 15मिनिटे मुरु द्यावे. म्हणजे सगळ्या घटकाच्या चवी यात उतरतात.यातील रव्यामुळे पीठाला घट्टपणा येतो आणि तांदळाच्या पिठीमुळे खुसखुशीतपणा येतो.

  5. 5

    कढईत तेल तापत ठेवावे.प्लॅस्टिक कागदावर तेल लावून व हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे थापून घ्यावेत.त्याला मधोमध भोक पाडावे.

  6. 6

    गरम तेलात छान लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत.

  7. 7

    खुसखुशीत, हलके असे मेदूवडे तयार आहेत.टोमॅटो सॉस व हिरव्या चटणीबरोबर हे भाताचे मेदूवडे गरमागरम सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes