स्प्राऊटेड मूग काॅर्न आणि पनीर कटलेट (Sprouted moong Corn Paneer Cutlet Recipe In Marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#LOR फ्रिजमधले मूग,काॅर्न आणि पनीर बघून काय करु सुचेना. मग त्याला आणखी काही पदार्थांची आणि मसाल्यांची जोड दिली आणि तयार झाले खमंग कटलेट.

स्प्राऊटेड मूग काॅर्न आणि पनीर कटलेट (Sprouted moong Corn Paneer Cutlet Recipe In Marathi)

#LOR फ्रिजमधले मूग,काॅर्न आणि पनीर बघून काय करु सुचेना. मग त्याला आणखी काही पदार्थांची आणि मसाल्यांची जोड दिली आणि तयार झाले खमंग कटलेट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटं
३ सर्व्हिंगज
  1. ‍ १ कप मोड आलेले मूग
  2. 1 कपमक्याचे दाणे
  3. 2उकडलेले बटाटे
  4. 3-4पातीचे कांदे आणि हिरवी पात
  5. 1 टेबलस्पूनचिरलेली हिरवी सिमला मिरची
  6. 4चिरलेल्या लसूण पाकळ्या
  7. 1/4 कपपनीर
  8. 1 टीस्पूनतेल
  9. 2 टीस्पूनअमूल बटर
  10. चिमूटभरहिंग
  11. 1 टीस्पूनधणेपूड
  12. 2 टीस्पूनलाल तिखट
  13. 2 टीस्पूनपावभाजी मसाला
  14. 4ब्रेड स्लाईस
  15. 2 टीस्पूनचिरलेली कोथिंबिर
  16. चवीनुसारमीठ
  17. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनीटं
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या चिरुन घ्याव्या. मका आणि मोड आलेले मूग वाफवून घ्यावे. आता एका कढईत तेल आणि बटर घालून त्यात लसूण आणि पातीचा कांदा परतावा.

  2. 2

    आता त्यात हिरवी पात आणि सिमला मिरची घालून परतावे आणि झाकण ठेऊन शिजवून घ्यावे. त्यात वरुन चिरलेली कोथिंबिर घालावी.

  3. 3

    बटाटे सोलून स्मॅश करुन घ्यावे. मग त्यात वाफवलेले मूग, मक्याचे दाणे, पनीर घालावे. मग त्यात शिजलेली भाजी घालावी आणि मिक्स करुन घ्यावे.

  4. 4

    आता त्यात धणेपूड, पावभाजी मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व नीट एकजीव करावे. हे मिश्रण मिक्सरमधे वाटावे. त्यात ब्रेडक्रम्स घालून मिक्स करावे. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करुन कटलेटचा आकार द्यावा.

  5. 5

    तयार कटलेट गरम तेलात खरपूस तळून घ्यावेत. शॅलो फ्राय सुद्धा करु शकता. साॅस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

Similar Recipes