व्हेजिटेबल कॉर्न सूप (Vegetable Corn Soup Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

व्हेजिटेबल कॉर्न सूप (Vegetable Corn Soup Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 छोटाबाउल कॉर्न / मका दाणे
  2. 1/4 बाउलकोबी चिरलेला
  3. 1/4 बाउलगाजर चिरलेले
  4. 1/4 बाउलफरसबी चिरलेली
  5. 1/4 बाउलकांद्याची पात
  6. 2 टेबलस्पूनलसुण बारीक चिरलेला
  7. 2 टेबलस्पूनआले बारीक चिरलेला
  8. 2 टेबलस्पूनकॉर्न फ्लॉवर
  9. 1 टेबलस्पूनमीठ
  10. 1 टेबलस्पूनविनिगर
  11. 1 टेबलस्पूनआमुल बटर
  12. 3 टेबलस्पूनतेल
  13. 1 टेबलस्पूनमीर पुड
  14. 3 बाउलपाणी
  15. 2 टेबलस्पूनपाणी कॉर्न फ्लोअर पेस्ट साठी

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सगळ्या साहित्याची तयारी करा. कोबी, गाजर, फरसबी, कांद्याची पात, आले, लसूण बारीक चिरून घ्यावे. तेल, अमुल बटर, कॉर्नफ्लॉवर, मीठ, मिरपूड, विनेगर हे सगळं काढून ठेवावे.

  2. 2

    3/4 बाउल कॉर्न मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी. 1/4 वाटी बाजूला कडून ठेवावे.

  3. 3

    कढई मध्ये तेल आणि बटर गरम करून घ्यावे आता त्यामध्ये लसूण आणि आले बारीक चिरलेले घालावे आणि थोडे परतावे. त्यानंतर बारीक चिरलेला सर्व भाज्या घालाव्या- कोबी गाजर, फरसबी, आणि कांदेपात घालावी व सर्व भाज्या चल्या मिक्स कराव्या.
    थोडीशी कांदेपात बारीक चिरलेली बाजूला काढून ठेवावी.

  4. 4

    आता लगेचच बाजूला ठेवलेले कॉर्न घालावे आणि सर्व 3-4 मिनिटे परतून घ्यावे चांगले शिजून येते. खूप लालसर शिजवायचे नाही. आता त्यानंतर कोण पेस्ट घालावी आणि 2-3 मिनिटे परतून घ्यावे.

  5. 5

    आता तीन भाऊ पाणी घालावे आणि आणि चांगले उकळू द्यावे. आता बाजूला ठेवलेली थोडीशी कांदेपात घालावी. त्यानंतर मिरपूड, मीठ घालावे. आता विनीगर घालावे आणि थोडे ढवळून घ्यावे. आता कॉर्नफ्लॉवर मध्ये दोन टेबलस्पून पाणी घालून चांगले मिक्स करून लगेचच उकळताना घालावे. आता चांगले ढवळून घ्यावे 1 मिनिटे आणि गॅस बंद करावा.
    गॅस नेहमी मध्यम ठेवावा.

  6. 6

    आता आपले व्हेजिटेबल कॉर्न सूप तयार झाले.
    सर्व्ह करताना मिरपूड, अमोल बटर, थोडीशी कांदेपात घालावी, लाईट सोया सॉस आपल्या आवडीनुसार घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

Similar Recipes