कॅबेज रोल अप्स (Cabbage Roll-ups Recipe In Marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#ATW1
#TheChefStory
भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या भाज्यांपैकी एक कोबी आहे. येथे स्ट्रीट स्टाइल कोबीची पाककृती खास स्टाइलने बनवत आहोत ती म्हणजे स्टफड कॅबेज रोल अप्स. नक्की करुन पहा.

कॅबेज रोल अप्स (Cabbage Roll-ups Recipe In Marathi)

#ATW1
#TheChefStory
भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या भाज्यांपैकी एक कोबी आहे. येथे स्ट्रीट स्टाइल कोबीची पाककृती खास स्टाइलने बनवत आहोत ती म्हणजे स्टफड कॅबेज रोल अप्स. नक्की करुन पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
10 सर्विंग
  1. पाणी (उकळण्यासाठी)
  2. 10कोबीची पाने
  3. स्टफिंगसाठी:
  4. 2 टेस्पूनतेल
  5. 2पाकळ्या लसूण (बारीक चिरून)
  6. 1कांदा (बारीक चिरून)
  7. 1शिमला मिरची (बारीक चिरून)
  8. 1बटाटा
  9. 1गाजर
  10. 1/2 कपमोड आलेले हिरवे मूग
  11. 2 टीस्पूनचिली सॉस
  12. 2 टीस्पूनव्हिनेगर
  13. 2 टेस्पूनसोया सॉस
  14. 1/4 टीस्पूनमिरपूड पावडर
  15. 1/4 टीस्पूनमीठ
  16. सॉस साठी:
  17. 3 टीस्पूनतेल
  18. 2पाकळ्या लसूण (बारीक चिरून)
  19. 2मिरच्या (बारीक चिरून)
  20. 1 टीस्पूनतीळ
  21. 2 टेस्पूनसोया सॉस
  22. 2 टेस्पूनस्प्रिंग ओनियन (चिरलेला)

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    रोलसाठी स्टफिंग बनवण्यासाठी -
    प्रथम मोठ्या कढईत तेल गरम करा. त्यात लसूण, कांदा, सिमला मिरची, गाजर, बटाट्याच्या फोडी आणि मोड आलेले हिरवे मूग घाला. आता चिली सॉस, व्हिनेगर आणि सोया सॉस घाला. चांगले एकत्र होईपर्यंत परतावे. मॅशरने मॅश करावे

  2. 2

    पनीर, मिरी पावडर आणि मीठ घाला. एक मिनिट परतावे. स्टफिंग तयार आहे.

  3. 3

    कोबीची पाने अलगद वेगळी करावी. पाने गरम पाण्यात 10 मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे पाने लवचिक होण्यास मदत होते.
    10 मिनिटांनंतर, कोबीचे पान घ्या आणि कडक भाग कापून टाका. अन्यथा रोल करणे कठीण होईल. व बाजूला ठेवा.

  4. 4

    कोबी रोल साठी-
    कोबीचे पान घेऊन त्यात 2 चमचे तयार स्टफिंग मध्यभागी ठेवा. स्प्रिंग रोलचा आकार तयार करण्यासाठी दोन्ही बाजूने फोल्ड करून रोल करा.

  5. 5

    आता रोल स्टीमरमध्ये ठेवा. 15 मिनिटे वाफवून घ्या.

  6. 6

    सॉस तयार करण्यासाठी:
    सर्वप्रथम, एका पॅनमध्ये तेल गरम करा. लसूण पाकळ्या आणि मिरच्या एक मिनिट परतून घ्या. आता तीळ घालून चांगले परता. नंतर त्यात सोया सॉस घाला आणि मोठ्या आचेवर परता. त्यात पाव कप पाणी, 2 चमचे पातीचा कांदा घाला आणि चांगले मिसळा. सॉसला उकळी आली की सर्व्ह करायला तयार आहे. शेवटी वाफवलेल्या स्टफ्ड कोबी रोलवर सॉस घाला.

  7. 7

    कॅबेज रोल अप्स तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes