पिकलेल्या केळ्याचे सांदण (Ripe Banana Sandan Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

सोपी आणि कमी वेळात होणारी रेसिपी आहे ... तसेच जास्त पिकलेली किंवा थोडी काळी पडलेली केळी फेकतो , ती न फेकता त्याचा असा वापर करून छान गोड पदार्थ तयार होतो ...

पिकलेल्या केळ्याचे सांदण (Ripe Banana Sandan Recipe In Marathi)

सोपी आणि कमी वेळात होणारी रेसिपी आहे ... तसेच जास्त पिकलेली किंवा थोडी काळी पडलेली केळी फेकतो , ती न फेकता त्याचा असा वापर करून छान गोड पदार्थ तयार होतो ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 5पिकलेली केळी
  2. 2 वाट्याजाडा रवा
  3. 2 वाट्यागूळ
  4. वेलची पॉवडर
  5. चवीनुसारमीठ
  6. आवश्यकते नुसारपाणी
  7. सुका मेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम २ वाट्या जाड रवा ५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा त्यामुळे रवा चांगला फुलतो (रव्या ऐवजी उकड्या तांदुळाची कणी घेतली तर उत्तम)

  2. 2

    नंतर गूळ बारीक करून त्याचे पाणी करून घ्यावे,ते गुळाचे पाणी फुललेल्या रव्यामध्ये घालावे

  3. 3

    त्यानंतर केळ्याची साले काढून घ्यावी व ती मिक्सर ला लावून त्याची पेस्ट करावी

  4. 4

    हि पेस्ट रव्याच्या व गुळाच्या मिश्रणात घालावी

  5. 5

    त्यामध्ये वेलची पॉवडर, चवीनुसार मीठ, सुका मेवा घालून सर्व एकत्र करून घ्यावे ते कुकर च्या डब्यामध्ये अर्ध्यापर्यंत ओतावे. मिश्रण डब्यात ओतण्या आधी डब्याला तेल लावून घ्यावे

  6. 6

    कुकर मध्ये नेहमी प्रमाणे पाणी ठेऊन मिश्रण ओतलेला डबा ठेवावा व कूकरचे झाकण लावून गॅस वर ठेऊन ३ शिट्ट्या काढाव्यात.(कुकर ऐवजी कढईत थोडे पाणी ठेऊन त्यावर स्टॅन्ड ठेऊन त्यावर डबा ठेवला तरी चालतो. डब्यावर झाकण ठेऊन कढई पण पूर्ण झाकून घ्यावी...हे २५ मिनिटे शिजू द्यावे)

  7. 7

    कूकर थंड झाला कि सांदण बाहेर काढून त्याच्या वड्या पाढाव्यात

  8. 8

    केळ्याचे सांदण फारच छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
रोजी
Mhapan vengurla

टिप्पण्या

Similar Recipes