पिकलेल्या केळ्यांच्या पुऱ्या / घाऱ्या (ghargya recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

जास्त पिकलेली केळी झाली की आपण फेकून देतो. या केळयांपासून विविध पदार्थ बनवता येतात.
मी आज त्यापासून पुऱ्या / घाऱ्या बनवल्या आहे. खूप छान झाल्या. तुम्ही नक्की करून बघा. प्रवासात नेण्यासाठी चांगल्या आहेत.

पिकलेल्या केळ्यांच्या पुऱ्या / घाऱ्या (ghargya recipe in marathi)

जास्त पिकलेली केळी झाली की आपण फेकून देतो. या केळयांपासून विविध पदार्थ बनवता येतात.
मी आज त्यापासून पुऱ्या / घाऱ्या बनवल्या आहे. खूप छान झाल्या. तुम्ही नक्की करून बघा. प्रवासात नेण्यासाठी चांगल्या आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
8-10 जणांसाठी
  1. 2पिकलेली केळी
  2. 1/2 कपबारीक रवा (1वाटी)
  3. 1 कपगव्हाचे पीठ (2वाटया)
  4. 1/2 कपगूळ (1/2 वाटी)
  5. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  6. 1/4 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    साहित्य जमवणे. केळी सोलून त्याचे तुकडे करून घेणे व गूळ सुरीने चिरून घेणे. मिक्सरच्या भांड्यामध्ये केळ व गूळ घालून वाटून घेणे.

  2. 2

    वाटलेले मिश्रण एका वाटी मध्ये काढून घ्यावे. त्यात वेलची पावडर, मीठ घालून मिक्स करून घेणे.

  3. 3

    बारीक रवा घालून मिक्स करून घेणे व गव्हाचे पीठ थोडे-थोडे घालून पिठ मळून घेणे.

  4. 4

    पिठ व्यवस्थित मळून घेणे व 1/2 तास झाकून ठेवावे

  5. 5

    पिठ मळून घेणे. एक मोठा गोळा घेऊन मध्यम जाडसर पोळी लाटून घ्यावी.वाटी किंवा कुकीज कटरने पुऱ्या करून घेणे.

  6. 6

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की गॅस मंद आचेवर ठेवून त्यात मावतील तेवढया पुऱ्या घालून दोन्ही बाजूंनी छान गुलाबीसर तळून घ्याव्यात. 4-5 दिवस टिकू शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes