मऊ खुसखुशीत तिळगुळवडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#TGR #मकर संक्राती स्पेशल # तिळगुळ घ्या गोड बोला संक्रातीसाठी मी स्पेशल मऊ खुसखुशीत तिळगुळवडी बनवली आहे लहानथोर सगळ्यांना सहज खाता येईल चला तर रेसिपी बघुया

मऊ खुसखुशीत तिळगुळवडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)

#TGR #मकर संक्राती स्पेशल # तिळगुळ घ्या गोड बोला संक्रातीसाठी मी स्पेशल मऊ खुसखुशीत तिळगुळवडी बनवली आहे लहानथोर सगळ्यांना सहज खाता येईल चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४-५ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम तीळ
  2. १५० ग्रॅम गुळ
  3. ६० ग्रॅम भाजलेले शेंगदाणे
  4. 2 टेबलस्पुनसाजुक तुप
  5. 1 टिस्पुनवेलची पावडर
  6. 2 टिस्पुनपाणी

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम तीळ चांगले भाजुन थंड करून ठेवा. नंतर शेंगदाणे भाजुन साल काढुन ठेवा वडी साठी लागणारा गुळ बारीक चिरून ठेवा. तीळ थंड झाल्यावर त्याची मिसरमधुन भरड पावडर व शेंगदाण्याची जाडसर भरड करून ठेवा. पसरट कढईत साजुक तुप किंचित गरम करून त्यात चिरलेला गुळ मिक्स करा व परतत रहा त्यातच थोडे पाणी मिक्स करा

  2. 2

    सर्व गुळ वितळेपर्यंत परतत रहा गुळाला उकळी यायला सुरवात झाल्यावर त्यात तिळ, शेंगदाण्याचे मिश्रण व वेलचीपावडर मिक्स करून परतुन मिक्स करा

  3. 3

    लगेच तुप लावलेल्या प्लेट मध्ये काढुन वरून थोडे तीळ पसरवुन वाटीच्या साहाय्याने ऐकसारखे थापुन घ्या व १५-२० मिनिटाने वड्या पाडा

  4. 4

    छोट्या ट्रे मध्ये तिळगुळाच्या वड्या सर्व्ह करा मस्त मऊ खुसखुशीत वड्या सर्व जणांना खाता येतील(तिळगुळ घ्या गोड बोला😁😁)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes