कुळथाची पिठी/ कुळथाचं पिठलं भात (Kulith Pithla Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#LCM1
#गावरान_रेसिपीस_चॅलेंज
#कुळथाची_पिठी_कुळथाचं_पिठलं
कुळथाचं पिठलं याला गावरान भाषेमधे कुळथाची पिठी असं म्हणतात. कुळथाची पिठी ही विशेष करून कोकणातील खूप गावांमधे बनवली जाते. गरमागरम कुळथाची पिठी आणि बरोबर वाफाळता भात असला की मग खाणार्रांसाठी पर्वणीच असते. कुळथाची पिठी बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते आणि पटकन बनवता येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. १५० ग्रॅम कुळीथ पीठ
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 2 टेबलस्पूनठेचलेला लसूण
  5. 4कोकम/ आमसुले
  6. 2 टीस्पूनमालवणी मसाला
  7. 1 टीस्पूनहळद
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. लसूण सोलून ठेचून घ्यावी.

  2. 2

    कढई मधे तेल घालून गरम झाल्यावर त्यात ठेवलेला लसूण घालून ब्राऊन होईपर्यंत परतावा मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून खरपूस परतून त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतल्यानंतर मालवणी मसाला, हळद आणि मीठ घालून परतावे.

  3. 3

    कांदा टोमॅटो परतून त्यात पाणी घालून उकळून घ्यावे. कुळथाच्या पिठीमधे पाणी घालून मिक्स करून कालवून घ्यावे, त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी

  4. 4

    उकळलेल्या कांदा टोमॅटोच्या मिश्रणात कोकम/आमसुले आणि पाण्यात कालवलेली कुळाची पिठी हळूहळू घालत सतत ढवळावे, म्हणजे पिठीमधे गुठळ्या होणार नाहीत. थोडावेळ उकळून पिठी शिजवून घ्यावी. आंबट तिखट अशी कुळथाची पिठी खायला खूप मस्त लागते.

  5. 5

    गरमागरम कुळथाच्या पिठी बरोबर वाफाळता भात वाढावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes