कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्यांचे उभे अगदी लांबट पातळ काप करून घेतले. तसेच कोथिंबीर व हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. सर्व एका बाऊलमध्ये मिक्स करून त्यात मीठ, लिंबाचा रस, थोडी पिठीसाखर घालून मिक्स केले.
- 2
सॅलड मिश्रण बनवण्यापूर्वी आपण सर्वात प्रथम पोळीसाठी डो तयार करून घेतला. त्यासाठी एका बाऊलमध्ये समप्रमाणात कणिक व मैदा घेऊन त्यात पिठीसाखर, मीठ व तुपाचे मोहन घालून चांगलं मिक्स करून घेतलं त्या मिश्रणाची मूठ वळली पाहिजे इतपत तूप घातले. नंतर थोडे पाणी घालून मिडीयम सॉफ्ट तयार केला व पंधरा मिनिट झाकून ठेवला.
- 3
आता टोमॅटोचे मिश्रण बनवून घेतले. त्यासाठी एका बाऊलमध्ये टोमॅटो सॉस, मिरपूड, तिखट, जिरेपूड, मीठ पिठीसाखर चाट मसाला सर्व मिक्स करून आपले मिश्रण तयार केले.
- 4
नंतर तीन्ही अंडे एका वाडग्यात फोडून घेतले व त्यात मीठ आणि रेड चिली सॉस घालून चांगले बीट करून घेतले.
- 5
डो मधील लहान गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटली. तिला सर्व बाजूंनी तेल लावून त्यावर मैदा भुरभुरला आणि सेंटर पर्यंत पिझ्झा कटरने कट करून घेतले. एक साईडने गोल करत त्याचा रोल बनवला.
- 6
तो रोल मध्ये बोटांनी प्रेस करून त्याचा गोल बनवून परत त्याची पातळ पोळी लाटली. तव्यावर थोड्या तेलावर दोन्ही बाजूंनी शेकून घेतली.
- 7
गॅसवर पॅन गरम करून ग्रिसींग करून घेतला. त्यावर अंड्याचे बॅटर निम्मे ओतून त्यावर लगेच पोळी घालून हलक्या हाताने प्रेस केले. त्याची अंड्याची बाजू ही व्यवस्थित शेकून घेतली.
- 8
आता तयार अंड्याची पोळी पोळपाटावर घेऊन त्यावर तयार टोमॅटोचे मिश्रण पसरविले मग सेंटरला सॅलड चे मिश्रण घालून त्याचा रोल बनवला.
- 9
तयार अंड्याचा रोल सेंटरला तिरपा कट करून डिशमध्ये ठेवून सर्व्ह केला. हा राजस्थानी पद्धतीचा एग रोल चवीला फारच सुंदर लागतो त्याची पोळी लच्छा पराठ्यासारखी बनवल्यामुळे सॉफ्ट छान बनते.
Similar Recipes
More Recipes


























टिप्पण्या