काकडीचे थालीपीठ (kakadi thalipith recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#थालीपीठ#किती प्रकारचे थालिपीठ करतो ना आपण... भाजणीचे , बिना भाजणीची ,आणखी काय काय ...असेच संध्याकाळचे मी काकडीचे थालीपीठ बनवले... हे थालीपीठ गरमागरम लोणचे, दही किंवा चटणीसोबत छान लागतात...

काकडीचे थालीपीठ (kakadi thalipith recipe in marathi)

#थालीपीठ#किती प्रकारचे थालिपीठ करतो ना आपण... भाजणीचे , बिना भाजणीची ,आणखी काय काय ...असेच संध्याकाळचे मी काकडीचे थालीपीठ बनवले... हे थालीपीठ गरमागरम लोणचे, दही किंवा चटणीसोबत छान लागतात...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
5 थालीपीठ
  1. 1 काकडीचा कीस
  2. 1मेजरींग कप कणीक
  3. 1/4 मेजरींग कप बेसन
  4. 1/4 मेजरींग कप तांदळाचे पिठ
  5. 1/4 मेजरींग कप ज्वारीचे पीठ
  6. 1 टीस्पूनओवा
  7. 1 टेबलस्पूनतीळ
  8. 1 टेबलस्पूनतिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनधने पूड
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनआले-लसूण पेस्ट
  13. 1 टेबलस्पूनथोडीशी कोथिंबीर
  14. चवीनुसार मीठ
  15. 3 टेबलस्पूनतेल
  16. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम काकडी स्वच्छ धुऊन घ्यावे व न सोलता किसून घ्यावे. आता त्या किसा मध्ये कणिक, ज्वारीचे पीठ, तांदुळाचे पीठ, बेसन, हळद, तिखट, मीठ, धनेपु ड, गरम मसाला,आले लसून पेस्ट,ओवा, तीळ टाकून एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    आता त्यात कोथिंबीर टाकून घ्यावी व आवश्यकतेनुसार पाणी टाकून थोडे सैलसर मिश्रण तयार करून घ्यावे.

  3. 3

    गॅस सुरू करून गॅस वर तवा ठेवावा. त्यावर तेल सोडावे. थाली पिठाच्या तयार मिश्रणाचा गोळा,ओल्या हाताने घ्यावा आणि गरम असलेल्या तव्यावर हाताने थापावा. थापलेल्या थालिपीठवर वरून तेल सोडावे.

  4. 4

    एका बाजूने शिजल्यावर बाजू परत परतून घ्यावे व दोन्ही बाजूंनी खमंग थालीपीठ भाजून घ्यावे. अशाप्रकारे गरमागरम काकडीचे थालीपीठ तयार आहेत. हे थालीपीठ लोणचे, चटणी, सॉस यासोबत छानच लागतात...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes