कैरीची जेली/ Raw Mango Jelly/ Raw Mango Candy/ Mango Jelly Dessert/ कैरी कि जुजुबी - मराठी रेसिपी

Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
Akola

सध्या आंब्याचा सिझन सुरू आहे. आणि कैऱ्या पण बाजारात आलेल्या आहेत. कैरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. कैऱ्या बाजारात आल्या की त्या कैरी पासून किती पदार्थ बनवू आणि कीती नाही असं होऊन जातं. कैरी पासून बनवलेले आंबट गोड पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात. तर कैरी पासून बनणारा आंबट गोड पदार्थ आणि बरेच महिने टिकणारा असा पदार्थ आज आपण पाहणार आहोत. आणि तो म्हणजे कैरी पासून बनणारी जेली. अशी ही आंबट गोड जेली लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते. व ती नेहमी खावीशी वाटते. तर मग बघूया आपण ही कैरीची जेली कशी बनवतात ते -

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

90 mins
4 servings
  1. कैरी - १/२ किलो
  2. साखर - १ वाटी
  3. पुदिन्याची पानं - १ वाटी
  4. मीठ - १/२ चमचा
  5. काळ मीठ - १/२ चमचा
  6. मिरेपूड - १/२ चमचा
  7. जिरा पावडर - १ चमचा

कुकिंग सूचना

90 mins
  1. 1

    सर्वप्रथम कैरी धुवून साल काढून घ्या व बारीक चिरून घ्या.

  2. 2

    आता एका मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे व पुदिन्याची पाने घालून बारीक करून घ्या लागल्यास त्यात थोडं पाणी टाका.

  3. 3

    कैरी मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर चाळणी मधून गाळून घ्या म्हणजे आपल्याला मऊ असा गर मिळेल व कचरा निघून जाईल.

  4. 4

    आता त्यात एक वाटी साखर घाला. कैरी जास्त आंबट असेल तर थोडी जास्त साखर घ्या.

  5. 5

    नंतर त्यात १/२ चमचा मीठ व १/२ चमचा काळ मीठ घाला. १/२ चमचा मिरे पूड व १ चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घाला आणि एकत्र करा.

  6. 6

    आता एक कढई किंवा पॅन घ्या त्यात हे मिश्रण घाला. व मध्यम आचेवर शिजायला ठेवा आणि सतत ढवळत रहा हळूहळू हे मिश्रण घट्ट होईल.

  7. 7

    आता गॅस मंद करा व त्यात एक चिमूटभर Green Food Colour (खाण्याचा हिरवा रंग) घाला व छान एकत्र करा आणि सतत ढवळत रहा म्हणजे ते मिश्रण छान घट्ट होईल. मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करा.

  8. 8

    नंतर एक ट्रे किंवा ताट घेऊन त्याला थोडं तेल लावा व तयार झालेले मिश्रण त्या ट्रेमध्ये टाका व छान पसरवून घ्या व एकसमान करा. आपल्याला त्याची जाडी थोडी जाड ठेवायचं आहे.

  9. 9

    आता ट्रे किंवा ताट एक पूर्ण दिवस उन्हात ठेवा किंवा रात्रभर फॅन खाली सुद्धा ठेवू शकता.

  10. 10

    आता हे मिश्रण वाळल की ट्रे च्या कडेकडेने चाकूने थोड सैल करून घ्या व ट्रे उलटा करून घ्या. आता आपला जेली बेस तयार झाला.

  11. 11

    नंतर चाकूने त्याचे चौकोनी तुकडे करा व एका भांड्यात काढून घ्या.

  12. 12

    आता एका भांड्यात बारीक साखर घ्या व त्यात ह्या जेली घाला व एकत्र करून घ्या लागल्यास त्यात अर्धा चमचा काळ मीठ घालू शकता. आता आपली जेली तयार आहे.

  13. 13

    तर ही कैरीची जेली लहान मोठ्या सर्वांनाच आवडते व सर्व आवडीने खातात. तुम्ही सुद्धा ही कैरीची जेली करून बघा व आम्हाला कशी झाली ते सांगा व फोटो शेअर करायला विसरू नका.

  14. 14

    टीप -
    * ही जेली तुम्ही मुखवास म्हणून सुद्धा खाऊ शकता.
    * या जेली मध्ये आपण लागल्यास चाट मसाला सुद्धा घालू शकतो.
    * कैरी किती आंबट आहे त्यानुसार साखर कमी जास्त घ्यावी.
    * जेली मध्ये आपण साखरे ऐवजी गुड सुद्धा घेऊ शकतो.
    * जेली तुम्ही वेगवेगळ्या आकारांमध्ये सुद्धा बनवू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
रोजी
Akola

टिप्पण्या

Similar Recipes