हीवाळा स्पेशल रेसिपी गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

गाजराचा रंगच आपल्याला बाजारात गेल्यावर आकर्षक वाटतो, त्यात थंडीमध्ये लहान मुलांना असो की मोठ्यांना असो भूक प्रचंड लागते आणि अशा वेळेस हा कलरफुल पण पौष्टिक आणि सर्वांना आवडणारा गाजर हलवा घरात असला किंवा त्यावर उड्या नाही पडला तरच नवल!, तर आज आपण बघूया सुंदर गोंडस दिसणारा हा गाजर हलवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1 किलोताजी आणि गुलाबी दिसणारी गजरा
  2. २०० ग्रॅम मावा
  3. 1मध्यम वाटी साखर
  4. 2 चमचेबदामाचे काप आणि १ चमचा बारीक केलेला काजू
  5. २०-२५ बेदाणे
  6. 2 चमचेसाजूक तूप
  7. 2लवंगा
  8. 1 चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम गाजर स्वच्छ धुऊन आणि किसून घ्यावे त्याचप्रमाणे मावा सुद्धा किसणीवर किसून घ्यावा.

  2. 2

    नंतर कढईमध्ये साजूक तूप घालून त्यावर दोन लवंगा घालाव्यात व नंतर काजू आणि बदामाचे काप परतून घ्यावे आणि लगेच गाजराचा कीस घालून सारखा परतत राहून शिजवून घ्यावा.

  3. 3

    गाजर दहा मिनिटं परतून झाल्यावर त्यावर साखर घालावी आणि नीट मिक्स करावे.

  4. 4

    साखर आणि गाजर नीट मिक्स झाल्यावरती किसलेला मावा, वेलची पावडर आणि एक चिमूटभर मीठ घालून सर्व व्यवस्थित सुके होईपर्यंत परतून घ्यावे आणि गरमागरम किंवा थंडही गाजर हलवा सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes