आंब्याची पुरणपोळी/ आंब्याची पोळी/ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी/ Aambyachi Puranpoli - मराठी रेसिपी

Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
Akola

आंब्याचा सिझन चालू झाला म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी. तर बघूया आपण आंब्याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवतात ते-

आंब्याची पुरणपोळी/ आंब्याची पोळी/ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी/ Aambyachi Puranpoli - मराठी रेसिपी

आंब्याचा सिझन चालू झाला म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी. तर बघूया आपण आंब्याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवतात ते-

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

90 mins
6 servings
  1. आंब्याचा गर - वाटी
  2. रवा - १ वाटी
  3. साखर - १ वाटी
  4. मीठ - चवीपुरते
  5. वेलची पावडर - १ चमचा
  6. कणिक - १ वाटी
  7. साजूक तूप - १/२ वाटी
  8. तेल - ३ ते ४ चमचे

कुकिंग सूचना

90 mins
  1. 1

    सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाची कणीक घ्या व त्यात चवीप्रमाणे मीठ घाला.

  2. 2

    नंतर त्यात एक चमचा मोहनासाठी तेल घाला व कणिक छान चोळून घ्या.

  3. 3

    आता त्यात थोडं थोडं पाणी घालून सैलसर मऊसुत अशी कणीक भिजवून घ्या व त्यात परत १ चमचा तेल घालून मळून घ्या व तासभर झाकून ठेवा.

  4. 4

    आता एका कढईत २ चमचे साजूक तूप घालून घ्या व त्यात १ वाटी रवा घालून मंद आचेवरती ५ ते ७ मिनिटे खरपूस असा भाजून घ्या.

  5. 5

    रवा खरपूस भाजून झाला की त्यात २ वाट्या आंब्याचा गर घाला व छान एकत्र करा व एक वाफ येऊ द्या.

  6. 6

    नंतर त्यात १ वाटी साखर घाला व एकत्र करा. साखर घातल्यानंतर आपलं सारण थोडं सैलसर होईल कारण साखर विरघळते म्हणून आपलं सारण थोडं पातळ होते. नंतर त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.

  7. 7

    आता त्यात वेलची पूड घाला व आणखी १ चमचा तूप घालून घट्ट होईपर्यंत सतत परतत रहा सारण घट्ट झालं की गॅस बंद करून सारण थंड होऊ द्या.

  8. 8

    सारण थंड झालं की त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. आणि आता आपली भिजवलेली कणिक घ्या.

  9. 9

    कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची लाटी घुळवून घ्या आणि वाटी सारखा आकार तयार करा.

  10. 10

    आता त्यात सारणाचा गोळा भरा व आपण मोदकाला वळतो त्याप्रमाणे कणिक वर खेचत खेचत घ्या आणि बंद करा.

  11. 11

    आता त्याला कणिक लावून पोळपाटावर थोडं कडे कडेने दाबून घ्या व पोळी लाटा.

  12. 12

    पोळी लाटून झाल्यावर गरम तव्यावर टाका. गॅस मंद ठेवा व साजूक तूप लावून शेकून घ्या. पोळीला जास्त उलट पालट करू नका कारण ती खूप नाजूक असते.

  13. 13

    पोळी छान शिकून झाली की तिला तूप लावून सर्व्ह करा.

  14. 14

    तर ही आपली आंब्याची पुरणपोळी तयार झाली आहे. ही आंब्याची पुरणपोळी गरमागरम खायला छान लागते. तुम्ही सुद्धा ही आंब्याची पुरणपोळी बनवून बघा व कशी झाली ते आम्हाला सांगा व फोटो शेअर करायला विसरू नका.

  15. 15

    टीप -
    * आंब्याच्या पुरणपोळी मध्ये तुम्ही साखरे ऐवजी गुळ सुद्धा घालू शकता.
    * आवडत असल्यास जायफळ सुद्धा आपण घालू शकतो.
    * पोळी लाटताना शक्यतो कमी कणीक लावावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
रोजी
Akola

टिप्पण्या

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
वाह छानच बनवल्या आहेत आंब्याच्या पुरणपोळ्या 👌

Similar Recipes