देठाळ (dethaal recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

माझी ही 151 वी रेसिपी आहे. जी माझ्या अगदी आवडीची
आहे. आमच्या कडे ही कोशिंबीर माझ्यासाठी खास आई बनवत असे. मला फार आंबडते. ही लालमाठ देठाची अनोखी कोशिंबीर जरूर ट्राय करा फार हेल्दी व पौष्टिक असते.

देठाळ (dethaal recipe in marathi)

माझी ही 151 वी रेसिपी आहे. जी माझ्या अगदी आवडीची
आहे. आमच्या कडे ही कोशिंबीर माझ्यासाठी खास आई बनवत असे. मला फार आंबडते. ही लालमाठ देठाची अनोखी कोशिंबीर जरूर ट्राय करा फार हेल्दी व पौष्टिक असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2सर्व्हिन्ग
  1. 1 कपलालमाठ देठे
  2. 1/2 कपदही
  3. 2हिरव्या मिरची चे तुकडे
  4. 3 टेबल स्पूनतेल
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनसाखर
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम लालमाठ भाजीची मागची देठे वेगळी करून ती बारीक कापून घ्या. पाण्यातून धुन घ्या वा 7-8 मिनिट शिजवून घ्या.

  2. 2

    मग त्यातील पाणी उपसून देठे वेगळी भांड्यात काढा. मग त्यात दही घाला. साखर, मीठघालून घ्या

  3. 3

    कढई गरम करून त्यात तेल घालून मोहरी, हिंग, हळद, मिरच्या घालाव्यात. तो तडका कोशिंबिरीवर घालावा. एकसारखी हलवून घ्यावी.

  4. 4

    एका भांड्यात काढून जेवताना सर्व्ह करावी फार सुदंर लागते. व आवडीने खातील कुटूंबातील सर्व.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes