फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)

#breakfast
#फोडणीचाभात
#fodnichabhat
#bhat
#GA4
#week7
गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.
फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे.
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast
#फोडणीचाभात
#fodnichabhat
#bhat
#GA4
#week7
गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.
फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे.
कुकिंग सूचना
- 1
फोडणीच्या भातासाठी लागणारे सगळे साहित्य तयार करून घेऊ, भाताला हाताने मोकळे करून घेऊ
- 2
आता कढईत तेल टाकून राई जीरे कढीपत्ता मिरच्या हिंग टाकून घेऊ
- 3
तेलाच्या फोडणीत सगळे पावडर मसाले टाकून घ्या
त्यावर भात टाकून परतून घेऊ भात व्यवस्थित मिक्स करून घेऊ - 4
भात मिक्स झाल्यावर साखर आणि लिंबूचे रस टाकून घेऊ. वरून कोथिंबीर टाकून भात मिक्स करून ठेव
तयार आपला फोडणीचा भात
Similar Recipes
-
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#LORआमच्यकडे भात उरला की फोडणीचा भात करते. हा भात शिळ्या (उरलेल्या ) भाताचाच मस्त होतो. Shama Mangale -
फोडणीचा भात.. (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीचाभातआपल्याकडे घराघरात एक गोष्ट आवर्जून केली जाते, आणि ती म्हणजे अन्नाची नासाडी न होऊ देणे...याचे उत्तम उदाहरण म्हणजे उरलेल्या भाता पासून तयार केलेला फोडणीचा भात... हाभात प्रत्येकाला आवडतो आणि चटकन संपतो देखील....कमीत कमी साहित्य वापरून केलेला हा फोडणीचा भात नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.... 💕💃 Vasudha Gudhe -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीचा भात# खरे तर रात्रीचा भात शिल्लक राहिला की दुसऱ्या दिवशी सकाळी या भातावर संस्कार करून चविष्ट खाण्यायोग्य बनविणे, हे प्रत्येक घरातील गृहिणी जाणते...फक्त संस्कार करण्याची पद्धत वेगळी....यातूनच नवीन प्रकार बनविल्या जातो....असाच प्रकार, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून मी आज केला आहे.... Varsha Ingole Bele -
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#CSRकांदा ,लसूण ,मिरची, कोथिंबीर टाकून केलेला फोडणीचा भात अतिशय चविष्ट होतो Charusheela Prabhu -
पारंपारिक पद्धतीने पापड पासून तयार केलेला स्नॅक्स'गिली रोटी' (gilli roti recipe in marathi)
#GA4#week23#papad#राजस्थानीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये पापड हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पापड पासून बनवलेला हा नाश्त्याचा प्रकार राजस्थान मध्ये फेमस असा नासत्याचा प्रकार आहे. भारतात किंवा भारताबाहेर जिथे मारवाडी असतात हा पदार्थ नक्कीच बनवून खातात. आपल्या देशाची संस्कृति आहे कधीही अन्न वाया जाऊ देत नाही हा पदार्थ त्यातूनच तयार झालेला आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडे रात्रीच्या पोळ्या किंवा सकाळच्या पोळ्या उरतात तेव्हा त्या पासून काय तयार करायची त्यासाठी हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे माझ्या लहानपणी आमची आझी नेहमीच आम्हाला हे बनून द्यायची तिला स्वतःला ही हा पदार्थ खूप आवडीचा आहे मारवाडी कम्युनिटीमध्ये जितके आजी-आजोबा मोठे वृद्धांमध्ये हा पदार्थ जास्त आवडीचा आहे उरलेल्या पोळ्यांमध्ये पापड टाकून नरम करून पोट भरून असा नाश्ता खाल्ला जातो चवीला खूप छान लागतो यात अजूनही एक प्रकारांनी पोळ्या मध्ये मुगाच्या वड्या टाकून ही हा पदार्थ तयार केला जातो. म्हणजे हा पदार्थ असा आहे भाजी आणि पोळी दोघं एकत्र तयार करून पोट भराऊ असा पदार्थ तयार होतो .माझ्याही घरात आठवड्यातून दोनदा तरी हा पदार्थ तयार होतो हा पदार्थ बनवण्यासाठी शिळ्या पोळ्या असल्या तर जास्त चविष्ट लागतो. कमी वेळात झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आता तुमच्याकडे पोळ्या उरल्या तर नक्कीच नाश्ता बनवून ट्राय करा याला कवे,गिल्ली रोटी असे म्हणतात. Chetana Bhojak -
-
फोडणीचा भात
#Goldenapron3 #leftover रात्रीचा भात उरला होता मग जास्त सामान न वापरता बनवला फोडणीचा भात Swara Chavan -
फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#mfr#World_food_day#फोडणीचा_भात आदल्या दिवशी रात्रीचा भात उरला की दुसर्या दिवशी फोडणीचा भात करणे हे शास्त्र असतं..😀..हे शास्त्र बहुतेक सर्व घरांमध्ये इमाने इतबारे पाळले जातेच जाते..अन्न उरले तरी ते वाया जाऊ न देणे ही आपली परंपरा..शिळ्या अन्नाचा चमचमीत make over करणे ही गृहिणींची खासियत..😊..तर *एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी*..हे गाणे गुणगुणत शिळे पदार्थ नवा चमचमीत अवतार धारण करुन खवैय्यांची रसनातृप्ती करतात..😍😋 चला तर मग या makeover कडे... Bhagyashree Lele -
फोडणीचा दही भात (Fodnicha dahi bhat recipe in marathi)
#MLRउन्हाळ्याच्या दिवसात रात्री साठी दही घालून भात व त्यावर खमंग फोडणी जोडीला सांडगी मिरची व पापड म्हणजे सुग्रास भोजन Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनरकूकपॅड कडून मिळालेल्या डिनर प्लॅनप्रमाणे लाल भोपळ्याची भाजी तयार केली. लाल भोपळा म्हटला म्हणजे माझ्यासाठी फक्त छान छान गोष्टी तले 'चाल रे भोपळ्या टुणुक टुणुक आजीची गोष्ट' माझ्या आठवणीत आहे माझ्या लहानपणापासून मी कधीच लाल भोपळ्याची भाजी खाल्ली नाही म्हणजे ते आमच्या खाद्य-संस्कृती ती भाजी खात नाही असे काहीतरी आहे मी बऱ्याच विचारायचा प्रयत्नही केला पण काही कळलेच नाही का खात नाही त्याचे शास्त्र काही माहीतच नाही इतके सांगितले गेले की आपण ती भाजी खात नाही. लग्नानंतर बऱ्याच वर्षानंतर ज्या ठिकाणी मी राहते इथे तर खूपच माझ्या आवडीप्रमाणे मला वातावरण मिळाले मुंबईत खाद्यसंस्कृती म्हणजे आपण बऱ्याच लोकांच्या खाद्यसंस्कृतीत बऱ्याच वेगवेगळ्या लोकांमध्ये राहतो त्यामुळे त्यांची खाद्यसंस्कृती आणि खाण्याचे पदार्थ ही करून बघायला खायला मिळतात. हे आवर्जून सांगायचीनंतर कद्दू, भोपळा ,डांगर ,कोळा ,पंपकीन अशी बरीच नावे कळली जेव्हा टेस्ट केला तेव्हा मी माझ्या आहारात त्याचा समावेश केला आणि आता बऱ्याचदा मी बनवूनही खाते आजही मी माझ्यासाठी बनवले आहेफोडणीत मेथीदाना टाकल्यामुळे याचा टेस्ट खूप छान जबरदस येतो जेव्हा फोडणी देतो त्याचा सुगंधित सुवास सगळीकडे पसरतो. या भाजीबरोबर वरण भात हवाच अजून छान लागतो. रेस Chetana Bhojak -
रसिया मुठिया (Rasiya Muthia Recipe In Marathi)
#LORरसिया मुठिया हा गुजराती प्रकार आहे हा उरलेल्या भाता पासून तयार केला जातो बऱ्याच दा हा प्रकार रात्रीच्या जेवणातून घेतला जातो म्हणून सकाळीच भात जास्त लावला जातो त्या भाता चा वापर करून रात्रीच्या जेवणातून रसिया मुठिया हा प्रकार तयार करतात.खायला एकदम चविष्ट लागतो हा प्रकार शिवाय खूप पौष्टिकही आहे.मी पण सकाळच्या उरलेल्या भाताचा हा प्रकार केला आहे हा प्रकार उरलेल्या भाता पासून तयार केला तरच खूप छान तयार होतो. मी ही रेसिपी माझ्या गुजराती फ्रेंड 'ज्योती वसानी' कडून शिकली आहे ती नेहमी मला खाण्यासाठी रसिया मुठिया द्यायची तिच्याकडून मीही रेसिपी शिकून घेतली माझ्या घरात मलाच हा प्रकार जास्त आवडतो मी आवडीने हा प्रकार खाते रात्रीचे जेवणातून घ्यायला अगदी परफेक्ट असा प्रकार आहे'रसिया मुठिया' म्हणजे रस्सा तयार करून मुठिया तयार केला जातो.तुमचाही भात जर उरला तर हा प्रकार एकदा ट्राय करून बघा. Chetana Bhojak -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीगव्हाच्या बारीक रवा म्हणजे लापशी यापासून खूप पौष्टिक अशी खिचडी तयार होते कोणत्याही प्रकारची डाळ वापरून भरपूर आवडत्या भाज्या टाकून या प्रकारची खिचडी तयार करता येते राजस्थानी, गुजराती कम्युनिटीमध्ये अश्या प्रकार ची खिचडी बर्याचदा बनवून खातात . खिचडी ही भारतात जितकी फेमस आहे तितकीच विदेशी लोकांनी हिला पौष्टिक मानले आहेभारतीय लोकांचा प्रमुख आणि मुख्य आहार म्हणजे खिचडी प्रत्येक प्रांतात आपआपल्या पद्धतीने तयार करून खिचडी आहारातून घेतली जाते खिचडी या प्रकारात कोणीच मोठा किंवा छोटा असा भेद नाहीबऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारच्या आजार असतात बरेच लोकांना ही मिरची तिखट मसालेदार असे जेवण घेता येत नाही मग ते आहारातून दलिया खिचडी ज्यामधून त्यांना गहू हे धान्य पण आहारातून घेता येते वन पॉट मील आणि पौष्टिक पदार्थ आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांनीही करोडपती या कार्यक्रमात सांगितले होते की ते जेवणातून दलिया खिचडी हा पदार्थ जास्त करून घेतात त्यांना पोटाचा काही आजार असल्यामुळे त्यांना मिरची मसाले हेवी फूड खाता येत नाही ते त्यांच्या आहारातून खिचडी जास्त प्रमाणात घेतातआपणही जिभेचे चोचले पुरवता पुरवता कधीतरी कुठेतरी थांबतो तेव्हा खिचडी हा पदार्थ सर्वात आधी डोक्यात येतो आता बस झालं बस खिचडी खायला पाहिजे आणि आहारातून खिचडी घेत असतोपोटाला ही खूप काही चटर पटर खाण्यापासून आराम देण्यासाठी खिचडी हा प्रकार चांगला आहेमी तयार केलेली दलिया खिचडी यात तांदूळ आणि डाळीचा वापर करून भाज्यांचा वापर करून तयार केली आहे बरोबर दही आणि पापड सर्व केले आहे Chetana Bhojak -
हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात : (kandyachya paticha fodnicha bhaat recipe in marathi)
हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात :#हिरव्याकांद्याच्यापातीचाफोडणीचाभात#हिरव्याकांद्याचीपात#GA4#week11मधे ग्रीन ओनीयोन (हिरव्या कांद्याची पात) हे key word वापरुन हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात बनवीला आहे.हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.भात हे एक महत्त्वाचे पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे.तांदळाला आपल्याकडे पूर्वीपासूनच महत्त्व आहे. घरात तांदूळ असणे हे भरभराटीचे मानले जाते. सर्व धार्मिक कार्यात तांदळाचीच गरज असते. आपल्याकडे तांदळाच्या पिठाची भाकर, घावणे, आंबोळी, डोसा, इडली, लाडू असे अनेक प्रकार केले जातात,.रोजच्या जेवणात भाताचे स्थान कायम असते. हा भात आजकाल विविध पद्धतीने बनविला जातो. साधा भात, स्टीम राईस, मसाले भात, साखर भात, फोडणीचा भात, दही भात, गोळा भात, बिर्याणी, पुलाव, व्हेज फ्राईड राईस, सेझवान राईस .आपल्याकडे भात उरला कि आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो खाली दिलेली कृती फोडणीच्या भाताची आहे पण हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात आहे .थोडी वेगळी आणि सर्वांनाच आवडेल अशी आहे. Swati Pote -
फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल फोडणीचा भातभंडारा,चंद्रपूर,गडचिरोली भागात भरपुर प्रमाणात तांदुळाची लागवड होत असते.जेवणात देखील भाताचे भरपुर प्रकार असतात आलटून पालटून वेगवेगळे प्रकार भाताचे केल्या जातात.... शिळा भात उरला की हा पदार्थ केल्याचं जातो...आणि 1 वाटी भात जरी असला तर बहीण भावात भांडणं देखील होतात... 😀याची चवच मस्त असते आणि झटपट होतो देखील... मी तर खास भात लावूनही हा फोडणीचा भात करते.तुम्हालाही नक्कीच आवडेल.... Shweta Khode Thengadi -
इन्स्टंट स्नॅक्स ब्रेड फ्राय (instant snacks bread fry recipe in marathi)
#bread#instantsnacksब्रेड आपल्या प्रत्येक घरात आणला जातो आणि खाल्ला जातो बऱ्याचदा आपल्याला गरज नसतानाही मोठा पॅकेट येतो त्याचे काही ब्रेड आपण वापरतो काही ब्रेड स्लाइस शिल्लक राहतात आणि थोडा शिळा झाल्यामुळे ब्रेड खायला आवडत नाही अशा वेळेस ब्रेड पासून स्नॅक्स तयार करून संध्याकाळच्या नासत्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात आपण घेऊ शकतोझटपट आणि पटकन तयार होणारी इंस्टंट अशीही रेसिपी आहे Chetana Bhojak -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#upma#उपमागोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ब्रेकफास्ट / सकाळचा नाश्ता . म्हणतात ना सकाळचा नास्ता हा राजेशाही असायला हवा. म्हणजे पौष्टिक, भरगोस व्यवस्थित पोट भरणारा जेवणाच्या वेळेपर्यंत आपल्याला भूक न लागणारा असा आपला नाश्ता असायला हवा. आजच्या धावपळीच्या जीवनशैली अत्यंत महत्वाचा भाग नाश्ता आहे.हा व्यवस्थित घेतला म्हणजे जेवण वेळेवर केले किंवा नाही केली तरी नाश्ता ने पूर्ण दिवस हा व्यवस्थित जातो.म्हणून सकाळचा नाश्ता हा नेहमी पौष्टिक असायला हवा पूर्वी आपल्या आजी ,आई शिळी पोळी लोणचे चहाबरोबर पोळी ,न्याहारी म्हणून घेत होते. आता आपल्याला भरपूर प्रकार नाश्त्यासाठी उपलब्ध आहे.म्हणून प्रत्येकाने न चुकता सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित केलाच पाहिजे.मी आज सकाळच्या नाश्त्याला उपमा केला त्याची रेसिपी शेअर करते. उपमा हा पौष्टिक असा नाश्ता आहे. Chetana Bhojak -
चित्रान्ना/लेमन राईस (Chitranna Recipe In Marathi)
#RR2#LEMONRICE#Chitrannaभारतातील साऊथ भागात म्हणजेच साउथ इंडियन मध्ये या भाताला चित्रान्ना म्हणजेच लेमन राईस म्हणतात. लिंबाचा आंबटपणा टेस्ट देऊन विशिष्ट साऊंड इंडियन फोडणी देऊन तयार केलेला हा भातखायला अगदी चविष्ट लागतो. तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये लंच किंवा डिनर मध्ये पण हा भात घेऊ शकतात बऱ्याचदा उरलेल्या भातापासूनही हा भात तयार करता येतो इथे मी हा खास भात तयार करण्यासाठीच तयार केलेला आहे अगदी हलकाफुलका असा हा भात असतो.साउथ मील मध्ये ताटात वाढला जाणारा प्रमुख भाताच्या प्रकारांमध्ये हा भातही असतो. बऱ्याच प्रकारचे प्रकारचे भात वाढले जातात त्यात हा भातही असतो.माझ्याकडे सासरी हा भात विशेष करून प्रवासात जाताना नक्की तयार करून बरोबर नेला जातो आणि प्रवासात दोन वेळेस तरी हा भात ते लोक खातात.बऱ्याचदा प्रवासासाठीही मी हा भात तयार करते खराब होत नसल्यामुळे छान लागतो खायला. Chetana Bhojak -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#लेमनराईसलेमन राईस ही रेसिपी मी माझ्या वहिनी कडून शिकलेली आहे माझी वहिनी ही साउथ मधील आंध्र प्रदेश ,हैदराबाद या शहरातली आहे त्यामुळे साऊथ ची लेमन राईस ही डिश पहिल्यांदा तिने घरात तयार केली तेव्हा पाहिले आणि त्यातला लेमन राईस, पुलिंहरा,रस्सम अशा बरेच प्रकार पदार्थ ती बनवाइची. पहिल्यांदा तिला तयार करताना हा राईस मी पाहिला होता आमच्या दोघांबद्दल आठवण म्हणजे राइस आहे तिला राईस खूप आवडायचे आमच्याकडे पोळी भाजी जास्त खाल्ली जायची पण मलाही राईस आवडायचे त्यामुळे आम्ही दोघी आमच्यासाठी राईस तयार करायचो माझ्या आवडीमुळे तिला राइस खायला मिळायचा माझ्या कंपनीमुळे तिला राईस तयार करायला आवडायचा राइस चे बरेच प्रकार तयार करायची तिला माझी खायची कंपनी असल्यामुळे ती राईस नेहमी तयार करायचीआम्ही दोघी आवडीने राईस चे जवळपास सगळेच प्रकार एन्जॉय करायचोतर बघूया लेमन करायची रेसिपी Chetana Bhojak -
-
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीभातशिल्लक राहीलेली कोणताही पदार्थ वाया न जावू देता त्यातून नविन उत्पत्ती करणे हे गहीणींचे कर्तव्य आहे. शिल्लक भातावर तर नवनविन रेसिपी तयार करता येतात. त्यात फोडणीचा भात तर सर्वांचा आवडता. Pritibala Shyamkuwar Borkar -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#GA4#week16#0rissa#dahibhat#दहीभातगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये week 16 मध्ये दिलेले 0rissa/ ओरिसा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ओरिसा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पर्यटनस्थळ समोर येतात जशे कोणार्क मंदिर जगन्नाथ पुरी चे तीर्थक्षेत्र आधी डोक्यात येतातचारधाम यात्रेतील जगन्नाथ पुरी हे पण एक तीर्थक्षेत्र आहे. कृष्णभक्ती मी लहानपणापासूनच माझ्या कुटुंब बघितले आणि आत्मसात केली आहे. खूप लहान असताना आम्ही कृष्ण साठी बरेच प्रसाद म्हणून घरात बनवायचे शिकलो होतो प्रत्येक जन्माष्टमी ला मोठ्या उत्सव आमच्याकडे होत असे त्यामुळे जवळपास सगळेच प्रसाद घरात बघायची आणि शिकूनही घेतलेले आहे . सगळ्यांना कृष्ण देवाला 56भोगप्रसाद म्हणून नैवेद्य दाखवतात असे बर्याच जणांना माहीत असेल , जिथे जिथे कृष्ण मंदिर , कृष्ण सेवा आहे तिथे तिथे हे सगळे प्रसाद बनवले जातात, त्यातच जगन्नाथ पुरी इथे प्रमुख भाताचे विविध प्रकार प्रसादात दाखविले जातात, दिवसभर कृष्णाला बऱ्याच प्रकारचे नैवेद्य दाखवल्यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिराचे पट/कपाट बंद करतात म्हणजे कृष्ण ला रात्रीच्या जेवणाचा सर्वात शेवटचा नैवेद्य दहीभात दाखवतात, दिवसभर बऱ्याच प्रकारचे प्रसाद नैवेद्यात खाऊन शेवटी संतुलित असा प्रसाद कृष्णदेवाला दाखवला जातो. तो खाऊ खाऊन कृष्णा ला पोढवतात . बघितला आपल्याला हे असंच रात्रीच्या वेळेस कसा हलकाफुलका खाता येईल ही शिकवण ही आपल्याला कृष्णा कडून मिळेल. अश्या बऱ्याच गोष्टी आपल्या शिकायला मिळतात. तसेच हाच प्रसाद लक्ष्मी मातेला ही नैवेद्य म्हणून दाखवला जातो. Chetana Bhojak -
राजस्थानी पारंपारिक गट्टा भाजी (gatta bhaji recipe in marathi)
#cooksnap#wd#Gattabhajiहिंदी कम्युनिटी तल्या ओथर Priya sharma यांची गट्टा भाजी हि रेसिपी सेम माझी आई बनवते तशीच आहे त्याची रेसिपी आणि आईची रेसिपी जवळपास सेम आहे फक्त थोडा फार बदल आहे. राजस्थानची फेमस आणि पारंपारिक गट्टा भाजी हि रेसिपी आहे आता राजस्थानचे खाद्य पदार्थ खाण्यासाठी आपल्याला कुठेच जावे लागत नाही बऱ्याच ठिकाणी राजस्थानी थाळी सिस्टम मध्ये आपल्याला राजस्थानी जेवण चाखायला मिळतेराजस्थान मध्ये बेसन ,गहू ,मूग ,मोठ असे बरेच प्रकारचे धान्य वापरून रोजच्या आहारात घेतले जाते त्या पासून बनणाऱ्या वस्तू रोजच्या जेवणातून आहारातून घेतल्या जातात. गट्टा भाजी बनवताना नेहमी मला माझ्या आई ची आठवण येते आई ही भाजी अशा प्रकारे तयार करून आम्हाला जेवणातून देत डाळ ,बाटी, गट्टा हे कॉम्बिनेशन ठरलेले असते. डाळ, बाटी, गट्टा भाजी असायलाच पाहिजे तरच जेवण परिपूर्ण होते. जेव्हाही मी पारंपारिक जेवण तयार करते तेव्हा आईची खूप आठवण येते तिच्याकडून खूप काही शिकले आहे तिने खूप तयार करून ठेवले आहे त्यामुळे आज कसलाच त्रास होत नाही. त्यासाठी आईचे खूप खूप धन्यवाद🙏Priya sharma यांची खूप खूप धन्यवाद त्यांच्या रेसिपी मुळे मला ही रेसिपी शेअर करण्याची इच्छा झाली Chetana Bhojak -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#Gr#मसालेभातमसाले भात बघता ,आणि विचार करता फक्त लग्नाच्या पंक्ती ,समारंभ आठवतात मला आठवते लहानपणी फक्त लग्नसमारंभात मसाले भात खाण्यासाठीच आम्ही आवर्जून जायचो. मसालेभात बरोबर माझी आठवण हि माहेरची आहे मी ज्या कॉलनीत/ गल्लीत वाढली 50 घरांची माझी कॉलनी आहे त्या कॉलनित सगळ्या प्रकारची लोकं राहतात प्रत्येक सणवार, सुख-दुःख तिथे एकमेकांत बरोबर वाटून करतात मसालेभात हा माझ्या सर्वात जास्त आवडीचा माझ्या कॉलनीतले राहुडे काका ते हा मसाले भात खूप जबरदस्त आणि छान बनवतात त्यांना खाऊ घालण्याची खूप आवड आहे आत्ताच मी माहेरी जाऊन आली तेव्हा ही त्यांनी गल्लीत चूल मांडून मोठ्या पातेल्यात मसाले भात तयार केला आणि सगळ्यांना बोलून खाऊ घातला मी ही भरपूर खाल्लात्यांच्या घरी लग्नसमारंभात आवर्जून फक्त मसाले भात साठी जायचं सुख दुःखातही त्यांच्याकडचा मसाले भात खाऊ नही यायचो आणि घरी पण घेऊन यायचो. प्रत्येक पदार्थाचा हा आपला पहिला एक अनुभव खाण्याचा पहिल्यांदा कुठे खाल्ला त्याची आठवण प्रत्येकाला असतेच तशी मसाले भात माझी पहिली आठवण म्हणून मला राहुडे काका समोर येतात आजही माहेरी जाते त्यांना सांगावे लागते कामी आली आहे मसालेभात पाठवा आणि ते आवर्जून पाठवतात.आजही त्यांना आठवण करून मसालेभात तयार करत होती प्रयत्न करत होती तो टेस्ट आणण्याचा तिच सगळे घटक टाकण्याचा प्रयत्नही केला. आता तो भात कसा तयार झाला त्याची पावती तर काकांकडून मिळणार पण ते शक्य नाही. अजून एक मसालेभात आमच्या कॉलनीत अश्विन नवरात्र मध्ये भंडारा भरतो पायी जाणाऱ्या यात्रांकरू साठी तिथे मसाले भात ,मठठा ,पुरी भाजी जेवण देतात माहेरी होती तेव्हा रोज खायची.माझ्यामसालेभाताच्यागोड आठवणी आज शब्दात रेसिपी बघूया प्रयत्न केला पारंपारिक पद्धतीने तयार करण्याचा Chetana Bhojak -
-
फोडणीचा भात रेसिपी (fodnicha bhat recipe in marathi)
फोडणीचा भात रेसिपी आजची ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून तर कधी ताजा भात शिजवून ही भाताची रेसिपी करतो. आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून केलेला फोडणीचा भात रेसिपी. Rupali Atre - deshpande -
कैरीचे आंबट फोडणीके वरण (kairiche ambat varan recipe in marathi)
#dr#कैरीचेवरण#dal#दाल#डाळ लोणचे तयार करताना कैर्याना आपण जी हळद मीठ लावतो हळद मीठ लावल्यानंतर कैरीपासून जे पाणी सुटते ते पाणी डाळ बनवण्यासाठी ठेवले होते त्या पाण्याचा वापर करून आंबट अशी डाळ तयार केलीत्या पाण्याचा वापर करून डाळ खूप छान तयार झाली आहे पाण्यात हळद,मीठ असल्यामुळे डाळ तयार करताना हळदीचा ,मिठाचा वापर केला नाहीआपण रोज डाळ करतो मग अशा वेळेस अशा प्रकारची डाळ तयार करून खाल्ली तरी खूप छान लागते आणि कैरीच्या पाण्याचा ही उपयोग होतो शेवटी आंबट पाण्याचा चाही स्वादाचा वापर डाळ करताना केला तर डाळीची चव वाढतेबघूया उरलेल्या कैरीच्या पाण्याचा उपयोग करून तुरीची फोडणीचे वरण कशे तयार केले Chetana Bhojak -
राबोडी भाजी (rabodi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशलरेसिपी#week3श्रावण महिन्यात काही भाज्या खाण्याची पथ्य पाळले जातात आमच्याकडे घरात आजी आणि आई बरेच पथ्य पाळते हिरव्या भाज्या ,कंदमुळ भाज्या खात नाही मग अशा वेळेस घरगुती तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या जातात त्यात मेथी दाना भाजी, पापड भाजी, राबोडी भाजी, मुगाच्या वड्याची भाजी असे घरगुती वाळवण तयार केलेल्या भाज्या श्रावण महिन्यात खाल्ल्या जातात. जैन लोकांमध्ये सर्वात जास्त ही भाजी खाल्ली जाते राबोडी ही वाळवण भाजी आहे जी वर्षभरासाठी तयार करून ठेवली जाते उन्हाळ्यात ही पापड सारखे तयार करून ठेवतातआंबट ताकात ज्वारीचे पीठ जीरे , लाल मिरची, मीठ टाकून राब उकळून उकळून बनवली जाते मग त्याचे उन्हात गोल गोल पळीने पापड सारखे टाकून कडक असे वाळून तयार करून ठेवतात हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतात याचा वापर भाजी तयार करण्यासाठी करतात. थोडा हा प्रकार बिबडया सारखा आहे बिबड्या हे तळून खाल्ले जातात आणि राबोडी ही फक्त भाजी साठी वापरली जाते. मी कांदा टाकून तयार केली आहे बिना कांद्याची ही भाजी छान लागतेराजस्थान मध्ये अशा प्रकारची वाळवण भाजी तयार करून खातात राजस्थानी लोक जवळपास सगळेच ही भाजी खातात . मराठीत आपण भाजी म्हणतो राजस्थानी भाषेत भाजीला 'साग' म्हणतातमलाही माझी आई वर्षभरासाठी हे राबोडी पापड तयार करून देते श्रावनात, पावसाळ्यात भाज्यांची कमी असल्यावर ही भाजी तयार करून खाता येतेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#Ravadosaगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Ravadosa हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. या कीवर्ड मुळे खूप दिवसांनी हलकाफुलक असं काही तयार करायला आणि खायला मिळाले. रवा डोसा माझ्या खूप आवडीचा आणि बनवायला खूप सोपा असा हा पदार्थ आहे नाश्ता ,लंच ,डिनर केव्हाही आपण हा घेऊ शकतो विशेष म्हणजे हे फरमेंट नसल्यामुळे खूप हेल्दी ही आहे पचायलाही खूप हलके जाते. हा बनवायला घेत असताना डोक्यात फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्ये खाल्लेला जाळीदार क्रिस्पी रवा डोसा आठवत होती ते कसे बनवून आपल्यासमोर ठेवतात जाळीदार खुसखुशीत बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा आपल्याला सर्व केला जातो आणि ऑर्डर घेताना ते फटाफट बोलतात साधा डोसा रवा डोसा, म्हैसूर डोसा, मॅडम कोणसा डोसा लेंगे असे विचारत गोंधळात पडतो पण अशा वेळेस माझ्या आवडीचा रवा डोसा मी घेते आजही बनवताना फक्त हॉटेल, रेस्टॉरंट स्टाईल चा रवा डोसा आठवुन तसाच तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तसाच झाल्यावर खूप आनंदही झाला खरंच बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा तयार झाला आहे बरोबर नारळ पुदिन्याची चटणी सर्व केली आहेरेसिपी तून नक्कीच बघा की कसा रेस्टॉरंट ,हॉटेल सारखा रवा डोसा कसा तयार झाला आहे. Chetana Bhojak -
पातीच्या कांद्याचा फोडणीचा भात (patichya kandhyacha podnicha bhaat recipe in marathi)
हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असते.रोजच्या जेवणात भाताचे स्थान कायम असते. हा भात आजकाल विविध पद्धतीने बनविला जातो. साधा भात, स्टीम राईस, मसाले भात,भात, फोडणीचा भात,, गोळा भात, व्हेज फ्राईड राईस, सेझवान राईस आपल्याकडे भात उरला कि आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो. भात शिल्लक होता. शिल्लक भातमध्ये हिरवा पातीचा कांदा टाकून फोडणीचा भात बनविला आहे. rucha dachewar -
संपूर्ण संतुलित आहार (sampurna santulit aahar recipe in marathi)
#immunityआजच्या परस्थिती बघता आपल्या जीवनात स्वत:वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. १)चवळीच्या भाजी दम्याच्या विकारावरही ही भाजी अतिशय गुणकारी आहे शरीरातील वात पित्त कमी करते थंडी ताप होत असेल तर ही भाजी नक्की खायला द्यावीहाडे पण मजबूत होतात, पोटाच्या विकारांवर ही भाजी खूप उपयोगी आहे पोटही खूप व्यवस्थित साफ होते रक्त शुद्धीकरणासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे लोह तत्व भरपूर आहे2)इम्युनिटी बुस्टर : तुरीच्या डाळीमुळे 'सी' जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तुरीची डाळ आहारातून घेतली पाहिजे. त्याचबरोबर सी जीवनसत्त्व अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते आपल्या बहुतेकांच्या आहारात तुरीच्या डाळीचा समावेश असतो3)भात-भातामध्ये मिनरल्स, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन असतात. जे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात. भातामध्ये व्हिटॅमिन D, निआसिन, थायामिन आणि रिबोफ्लेविन असते. जे तुमच्या शरीराला पोषण देत असते. भातामधील अँटीऑक्सिडंट प्रापर्टीज अनेक आजारांसाठी गुणकारी आहे.4)गव्हाची पोळी- वास्तविक या पोळीमध्ये कार्बोहायड्रेड्स असतात जे तुमच्या शरीरातील कमतरता पूर्ण करतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेच एनर्जी मिळते आणि तुम्हाला उत्साही वाटतं.5)सलाद- रोजच्या जेवणात सलाद घेतले तर पचनक्रिया सुधारते हाय फायबर आणि अँटिऑक्सिडंट आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते अशा प्रकारचे संतुलित आहार दुपारच्या जेवणात घेतले पाहिजे दिलेल्या ताटात चवळीची भाजी, डाळ भात, फुलके, सलाद ,दही वाढले आहे Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (2)