स्प्रिंग ओनिअन सब्जी (Spring Onion Sabji Recipe In Marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week11
हिरवा कांदा किंवा कांदा पात हे कीवर्ड घेऊन कांदा पातीची पीठ पेरून भाजी केली आहे. ही भाजी भाकरी बरोबर खायला खूप छान लागते.

स्प्रिंग ओनिअन सब्जी (Spring Onion Sabji Recipe In Marathi)

#GA4 #week11
हिरवा कांदा किंवा कांदा पात हे कीवर्ड घेऊन कांदा पातीची पीठ पेरून भाजी केली आहे. ही भाजी भाकरी बरोबर खायला खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
5 माणसांसाठी
  1. 2 कपकांदा पात
  2. 2 कपपातीचा कांदा
  3. 1 कपबेसन
  4. 1/4 टेबलस्पूनहळद
  5. 1/4 टेबलस्पूनजीरा पावडर
  6. 1/2 टेबलस्पूनधणे पावडर
  7. 1 टेबलस्पूनतिखट
  8. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  9. चिमुटभरहिंग
  10. 1/2 टेबलस्पूनजीरे
  11. 1/2 टेबलस्पूनमीठ
  12. 3 टेबलस्पूनतेल
  13. 7ते 8 लसणाच्या पाकळ्या

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    प्रथम पातीचा कांदा व पात दोन्ही स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. इतर सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.

  2. 2

    एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात जीरे व बारीक चिरलेला लसूण घालावा.

  3. 3

    लसूण लालसर झाल्यावर त्यात कांदा घालून परतून घ्यावे. त्यात हिंग व हळद घालावी.

  4. 4

    त्यात कांदा पात, तिखट व जीरा पावडर घालावी.

  5. 5

    धणे पावडर, मीठ व बेसन घालावे.

  6. 6

    गोडा मसाला घालून परतून घ्यावे व झाकण ठेवून वाफेला ठेवावे. 5 मिनीटे शिजू द्यावे. गॅस बंद करावा.

  7. 7

    भाजी एका भांड्यात काढून त्यावर कोथिंबीर घालून गार्नीश करावे. ही भाजी ज्वारी-बाजरीच्या भाकरी बरोबर खायला खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes