मोडाची मटकी कुळीथ उसळ (modachi mataki kulith usal recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#GA4
#week11
#sprout
उसळ एक अतिशय सोपा पण चविष्ट, झणझणीत महाराष्ट्रीयन सुकी भाजीचा प्रकार आहे जी मोडाची मटकी वापरुन बनवले‌‍ जाते. त्यामध्ये मोडाची कुळीथही घातल्याने ती अजूनच चविष्ट आणि पौष्टिक अशी उसळ तयार होते. चला तर बघूया मोडाची मटकी कुळीथ उसळ.......

मोडाची मटकी कुळीथ उसळ (modachi mataki kulith usal recipe in marathi)

#GA4
#week11
#sprout
उसळ एक अतिशय सोपा पण चविष्ट, झणझणीत महाराष्ट्रीयन सुकी भाजीचा प्रकार आहे जी मोडाची मटकी वापरुन बनवले‌‍ जाते. त्यामध्ये मोडाची कुळीथही घातल्याने ती अजूनच चविष्ट आणि पौष्टिक अशी उसळ तयार होते. चला तर बघूया मोडाची मटकी कुळीथ उसळ.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्विंग
  1. 1 कपमटकी आणि कुळीथ
  2. 1 टीस्पूनमोहरीचे दाणे
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. चिमुटभरहिंग
  5. 2कांदे बारीक चिरून
  6. 7-8लसूण पाकळ्या
  7. 1टोमॅटो बारीक चिरून
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 3 टेस्पूनघरी तयार केलेला मसाला पावडर (किंवा चवीनुसार)
  10. कोथिंबीर
  11. चवीनुसारमीठ
  12. तेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करणे. मटकी आणि कुळीथ एकत्रच स्वच्छ धुऊन आदल्या दिवशी सकाळी भिजत घालायचे.सात ते आठ तास भिजवल्यानंतर त्यांना स्वच्छ धुऊन घ्यावे त्यामुळे ते वातूळ होत नाही आणि त्यांना मोड आणण्यासाठी चाळणीत मोड येईपर्यंत झाकून ठेवले होते त्याला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चांगले मोड येतात त्यानंतर त्याची भाजी करायला घ्यावी. मोड आलेली कडधान्य खूपच पोष्टिक असतात. एका मोठ्या कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन ते तापले की त्यमध्ये जीरे, मोहरी हिंग आणि लसणाची फोडणी द्यायची. त्

  2. 2

    त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा तो गुलाबीसर झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालावा दोन्ही व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये मोड आलेली मटकी आणि कुळीथ घालून तेही चांगले ५ मि परतून शिजवून घ्यायचे. त्यामध्ये आता घरगुती काळा मसाला आणि हळद घालून परतून घ्यायचे

  3. 3

    त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून नीट मिक्स करून घेणे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे भाजीतले पाणी उकळायला लागल्यानंतर त्यावर झाकण ठेवून उसळ सात ते आठ मिनिटे मंद गॅस वर शिजवून घ्यावी. उसळ शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर पेरावी. तयार आहे आपली एकदम चविष्ट आणि झणझणीत मोड आलेल्या मटकी आणि कुळथाची उसळ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes