शेपूची गोळा भाजी (sepuchi goda bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
शेपूची गोळा भाजी (sepuchi goda bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भाजी निवडून बारीक कापून स्वच्छ 2 पाण्यात धून निथळूम थोड्या तेलात फोडणी हिंग व अर्धलसून घालुन भाजी परतावी
- 2
त्यात मीठ तिखट हळद घालावी व परतावे मिठाने भाजीला पाणी सुटते झाकण ठेवून 5मिनिट शिजवावी मग पीठ पेरावे व एकजीव करून अजून 5 ते 7 मिनिय शिजवावे मग उरलेलं तेलात लसूण मस्त सोनेरी होईपर्यंत ठेऊन ही फोडणी वर घालावी
- 3
व भाकरी ठेचा कांदा मिरची बरोबर खायला द्यावी अतिशय रुचकर भाजी होते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेपूची वडी (sepu vadi recipe in maartahi)
रेसिपीची गोष्ट अशी नाही पण, शेपू किती पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच पण आमचे यजमान आणि चिरंजीव शेपू म्हटले कि नाक मुरडतात म्हणून मी एकदा शेपूची वडी करून पहिली आणि काय गंमत बघा यजमान आणि चिरंजीव यांनी आनंदाने खाल्ली सुद्धा.. Sheetal Mahadik -
शेपूची भाजी (Shepuchi Bhaji Recipe In Marathi)
मूग डाळ भिजवलेली घालून केलेली शेपूची भाजी त्याला लसणाची फोडणी खूप टेस्टी व छान होते Charusheela Prabhu -
शेपूची भाजी (shepu bhaji recipe in marathi)
शेपूच्या उग्र वासामुळे अनेकजण शेपूची भाजी खात नाहीत. शेपूची भाजी पचायला हलकी असते. शेपूमध्ये कॅल्शियम व आयर्न आढळते. मी शेपूची भाजी भिजवलेले मसुर दाळ वापरून केली आहे. मुगदाळ पण वापरू शकतो. Ranjana Balaji mali -
शेपू भाजी (shepu bhaji recipe in marathi)
#HLR#शेपूची भाजी आता सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे. हिवाळ्यात ऋतू मध्ये छानशा हिरव्या पालेभाज्या येतात. त्यामध्ये छानशी हिरवीगार शेपू मी हेल्दी रेसिपी साठी निघत आहे, शेपू ही पोस्टीक अशी भाजी आहे.स्नेहा अमित शर्मा
-
शेपूची भाजी रेसिपी (sepuchi bhaji recipe in marathi)
#cooksnap#शेपूची भाजी रंजना माळी यांची मी शेपूची भाजीची रेसिपी कूकस्नॅप करत आहे.खूप छान झाली होती भाजी यात मी थोडासा बदल केला आहे.Thanks for nice resipeआहारात पालेभाजी म्हटली म्हणजे अनेकजण नाकं मुरडतात. आणि त्यात 'शेपू'ची भाजी म्हटली की त्याच्या एका विशिष्ट वासामुळे अनेकजण ती टाळतात.शेपूची भाजी रेचक,पचायला हलकी असल्याने त्यामुळे पचनक्रियेचा मार्गदेखील मोकळा होता.अपचनामुळे छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी शेपू अतिशय फायदेशीर आहे. nilam jadhav -
शेपूची भाजी
शेपूची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. पण ही भाजी अत्यन्त गुणकारी पौष्टिक आहे. पोटाचे आरोग्य राखण्यासाठी ही भाजी नेहमी आपल्या आहारात असणे आवश्यक आहे. शेपूची भाजी मूगडाळ व शेंगदाण्याचे जाडसर कुट घालून बनविली जाते. Manisha Satish Dubal -
बेसन पेरून कांदा पात भाजी (Besan Perun Kanda Paat Bhaji Recipe In Marathi)
खरंतर मी हिरवी मिरची, कांदा, ओलं खोबरं घालून कांदा पातीची भाजी बनवते. पण आज म्हटलं बेसन पेरून करून बघू या. खूप मस्त झालीय.... Deepa Gad -
शेपूची डाळ भाजी (sepuchi dal bhaji recipe in marathi)
#GR#गावरानरेसिपीज# शेपूशेपूची डाळ भाजी ही माझ्या सासूबाईची रेसिपी. आमचा खूप मोठा परिवार आणि घरातील परिस्थिती ही बेताचीच. कमावणारी व्यक्ती एक आणि खाणारी तोंडे 12. त्यामुळे घरात कुठलीही पालेभाजी आली कि, ती भाजी सर्वांना कशी पुरेल याचा जास्त विचार केला जायचा. शेपूची भाजी आमच्याकडे सर्वांच्या आवडीची भाजी. सुकी भाजी केली तर ती खूप थोडी होते. एवढ्या लोकांना ती पूरणार कशी... मग यावरचा हा तोडगा....मग काय शेपुची डाळ भाजी घरात बनविली जायची. त्याच्या सोबत चुलीवर भाजलेल्या मिरच्या, हाताने ठेचलेला कांदा, ज्वारीचे पापड आणि गरमागरम भाकर आणि वाफाळलेला भात..आहाहा... काय तो गावरान बेत... अप्रतिमतेव्हा नक्की ट्राय करा *शेपुची डाळभाजी*💃 💕 Vasudha Gudhe -
शेपूची भाजी (Shepuchi Bhaji Recipe In Marathi)
आहारामध्ये पालेभाजी म्हणजे अनेक जण नाक मुरडतात. त्यात शेपूची भाजी तर एका विशिष्ट वासामुळे खाणे टाळतात.पण यातील गुणधर्म बघता ती आहारात हवीच यात मॅगनिज सल्फेट भरपूर प्रमाणात असतात.यामुळे हाडे मजबूत होतात पचनासाठी उत्तम. आशा मानोजी -
शेपूची भाजी व भाकरी (Shepuchi Bhaji Bhakri Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा स्पेशल रेसिपी.आज गौरींचे आगमन झाले. या दिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य असतो.शेपूची भाजी व ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी. Sujata Gengaje -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#GR गुजराती लोकांमध्ये अत्यंत प्रिय असलेली ,एकदम आयत्या वेळी झटपट होणारी स्वादिष्ट खमंग भाजी Pooja Katake Vyas -
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
शेपूची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)
#gur#शेपूची_भाजी..😋😋 गणपती आगमनानंतर दोन दिवसांनी ज्येष्ठा गौरींचे आगमन होते..ज्येष्ठा गौरींचे वाजतगाजत आगमन झाल्यावर त्या स्थानापन्न झाल्यावर त्यांची पूजा करुन त्यांना शेपूची भाजी ,भाकरीचा नैवेद्य दाखवतात..या सिझनमध्ये मिळणार्या ताज्या शेपूची चव काही औरच असते..म्हणून या माहेरवाशिणीसाठी मुद्दाम ह्या खमंग खरपूस शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवतात..चला तर मग माझ्या अत्यंत आवडीच्या या भाजीची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
-
शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi)
#GRशेपूची डाळ घालून कोरडी भाजी, शेपूची शेंगदाणे कूट लाऊन भाजी ,शेपूच्या मुटकुळे ,पराठे,धीरडे असे अनेक पदार्थ आपण करतोच .पण त्यातच थोडेसे वेरिएशन व हेल्दी अशी मी शेपू च्या डाळ वड्या केले आहेत .खूप सोप्या व चविष्ट होणाऱ्या वड्या एकदा नक्की ट्राय करा .जे शेपू खात नाही ते पण मागून मागून खातील अशी ही रेसिपी आहे Bharti R Sonawane -
झणझणीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
तर्री असलेली तिखट झणझणीत शेव भाजी ,भाकरी,कांदा खूप टेस्टी बेत Charusheela Prabhu -
शेपू मटकी डाळ भाजी (sepu matki dal bhaji recipe in marathi)
#GR#शेपूमटकीडाळभाजीशेपूची भाजी बर्याचदा बऱ्याच घरांमध्ये खाल्ली जात नाही त्याची बरीच कारणे आहेत याचा उग्र वास, खाल्ल्यामुळे येणारे ढेकर माझ्याकडेही हीच कारणे आहे कि ती खाल्ली तर ढेकर येते अन त्याचा उग्र वास आवडत नाही. पण मी माझ्या माहेरी ही भाजी लहानपणापासून खाल्लेली आहे आणि याच पद्धतीने खाली आहे या भाजीचे पराठे ही बऱ्याचदा माझी आजी बनवून द्यायची मटकीची डाळ माझ्या आजीची खूप फेव्हरेट डाळ आहे तिच्या आवडीमुळे आम्हाला ही डाळ खाण्याची सवयही लागली आहे . शेपूची भाजी आहारातून घेतलीच पाहिजे त्याच्या आरोग्यावर खुप फायदे आहे कोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार, स्त्रियांचे आजार मधुमेह जितके ही आजार आहे त्या सगळ्यांवर शेपूची भाजी आहारातून घेतल्याने फायदा होतो. बाळपणीत स्त्रियांनाही भाजी दिली जाते शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी बाळांतपनीत दिली जाते. शेपू मटकीची डाळ भाजी ही अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केली आहे ही रेसिपी मि माज्या आजीकडून शिकून घेतली आहे आमची आजी शेपू खाण्यासाठी यात ही डाळ टाकूनच तयार करते म्हणजे यानिमित्ताने तरी ही भाजी खाल्ली जाईल आणि शेपू आणि डाळ मिश्र करून खाल्ली तर ते छान लागते. मटकीच्या डाळीने अजून ही भाजी चविष्ट होते. शेपू ,सुवा,dili lives,शेफा अशा बऱ्याच वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जातेतर बघूया शेपू मटकी डाळ भाजी कशी तयार केली Chetana Bhojak -
रेस्टॉरंट स्टाईल लसुनी दाल पालक (Restaurant Style Lasooni Dal Palak Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसातला कोवळा पालक आणि त्यामध्ये डाळ आणि लसणाचा तडका व त्याबरोबर बाजरीची भाकरी वाव सुपर कॉम्बो Charusheela Prabhu -
कांद्याच्या पातीचा झुणका -ज्वारीची पुरी (paticha zhunka jowaricha puri recipe in marathi)
#EB2 #W2हिवाल्यात सर्वच हिरव्या भाज्या मस्त मिळवतात नि कांद्याची कोवली पात व त्याचा पीठ पेरून झुणका खूप छान होतो Charusheela Prabhu -
मसूर पार्सले भाजी (Masoor Parsley Bhaji Recipe In Marathi)
#BKR ही भाजी पार्सले,शेपू वापरून केली आहे.यात पालकही वापरता येईल.वेगळी चव घेण्यासाठी करून पहा..... Shital Patil -
शेपू मूग डाळ भाजी (sepu moong dal bhaji recipe in marathi)
लुसलुशीत शेपू हिरवीगार छान दिसते.खायला जरा सर्वजण कंटाळा कर्तयापण डाळ घालून मस्त चव येते.:-) Anjita Mahajan -
मेथीची गोळा भाजी
#goldenapron3 Week5 साठी सब्झी हा की वर्ड वापरून मेथीची गोळा भाजी केली आहे.माझ्या आईकडून ही रेसिपी मी शिकली आहे. सगळे आवडीने खातात आमच्या घरी ही भाजी. Preeti V. Salvi -
शेपू मूग डाळ भाजी (shepu moongdal bhaji recipe in marathi)
शेपू ही भाजी तशी पावसाळ्यातच मिळते आणी मला खूप आवडते तशी ती प्रकृतिनी वातहारक असते. बाळंतिणी ला तर विशेष दिली जाते. खूप लोकांना ही भाजी विशेष आवडत नाही पण मझ्याकडे मूग डाळ घालुन थोडी क्रिस्पी केलेली भाजी सगळ्यांनाच आवडते. Devyani Pande -
कांद्याची पात भाजी (पिठ पेरून) (kadyachi pat bhaji recipe in marathi)
#EB4#week4#हिवाळ्यात कांद्याची पात मुबलक प्रमाणात मिळते. पीठ पेरून भाजी मस्त होते अवश्य करून पहा. Hema Wane -
शेपू मेथी मिक्स भाजी (sepu methi mix bhaji recipe in marathi)
#HLRदिवाळीचे पदार्थ गोड पदार्थ खाल्ल्यानंतर सर्वांना भाजी भाकरी डाळ भात असं साधं जेवण पंचपक्वान सारखं वाटायला लागतं हे जेवण जेवल्यानंतर एक वेगळीच तृप्ती मिळते Smita Kiran Patil -
बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.मी आज बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी बनवली आहे. Sujata Gengaje -
शेपूची भाजी (shepuchi bhaji recipe in marathi)
शेपूची भाजी काही लोकांना आवडत नाही पण अशी बनवली तर नक्की आवडेल. Rajashree Yele -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4कोवळी पात त्याच्या कांद्यासकट बारीक चिरून बेसन पेरून भाजी एकदम सुंदर होते Charusheela Prabhu -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#tri TRI इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंजतीन घटक वापरून त्याची रेसिपी बनविणे हे चॅलेंज स्वीकारून मी 'कांदा पातीची भाजी' बनविण्याचे ठरविले. लसणाचा वापर करून ही पातीची भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल. मी ती केली तुम्हीही करून बघा. 🥰 Manisha Satish Dubal -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#week4 " कांद्याच्या पातीची भाजी"चना डाळ घालून अतिशय चविष्ट होते ही भाजी..सिजन मध्ये आम्ही नेहमीच बनवतो. आणि आवडीने खातो.. कांद्याची पात घालून पिठलं, पीठ पेरून भाजी, झुणका, लाल तिखट घालून भाजी, हिरवी मिरची लसूण घालून भाजी.. अशा अनेक प्रकारे भाजी बनवू शकतो.. आवडीनुसार..मी हिरवी मिरची लसूण घालून बनवली आहे.. त्यामुळे भाजीचा रंग हिरवागार राहातो आणि टेस्टी होते.. लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14656924
टिप्पण्या (2)