कैरीचा तक्कू (kairiche takku recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#समर स्पेशल

कैरीचा तक्कू (kairiche takku recipe in marathi)

#समर स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मि
10-12 सर्व्हिंग
  1. 1तोतापुरी कैरी
  2. 2 टेबलस्पूनगुळ
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 1 टेबलस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. 1कांदा बारीक कट करून
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20-25 मि
  1. 1

    प्रथम कैरी साले काढून खिसुन घेणे आणि गूळ सुद्धा खिसुन घेणे.

  2. 2

    आता पॅन मध्ये तेल ऍड करून मध्यम आचे वर गरम करा आणि त्यामध्ये मोहरी ॲड करा. मोहरी तडतडली की गॅस बंद करा हिंग घालून घ्या आणि हा तडका थंड होण्यासाठी दहा मिनिटे ठेवा.

  3. 3

    तोपर्यंत किसलेल्या कैरी मध्ये गूळ आणि साखर आणि मीठ ऍड करून छान मिक्स करून घ्या.

  4. 4

    आता थंड झालेल्या तेलामध्ये तिखट ऍड करून मिक्स करून घ्या. आता हे पूर्ण थंड झालेला असेल त्यानंतर त्यामध्ये मिक्स केलेली कैरी ऍड करा आणि सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या.

  5. 5

    कैरीचा तक्कू तयार. आता मी दोन प्रकारचे तक्कु बनविलेले आहेत त्यामुळे तयार झालेल्या मिश्रणा मधील अर्धे मिश्रणामध्ये मी कट केलेला कांदा ॲड केला आणि छान मिक्स करून घेतलेला आहे.अशाप्रकारे हे दोन तक्कु तयार कांदा आवडत नसेल तर प्लेन तक्कु सुद्धा अप्रतिमच लागतो.

  6. 6

    हे तक्कू पोळीबरोबर किंवा तोंडीलावणे म्हणून खूपच टेस्टी,चटकदार लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes