खमंग खुसखुशीत पालक वडी (palak vadi recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#Cooksnap

"खमंग खुसखुशीत पालक वडी"

माझी मैत्रीण चारुशीला प्रभु ची रेसिपी आहे.. Thank you dear ❤️
खुप छान खमंग वडी झाली होती.आम्हाला खुप आवडल्या.मी यापुर्वीही पालक वडी बनवली होती पण अळुची बनवतो तशी पान एकमेकांना चिकटवत केली होती 😀
भाजी कापून किती सोपे झाले वड्या बनवायला.. थोडीशी कोथिंबीर टाकली.खुप छान मिळून आली वडी..मी अगदी थोडासा बदल केला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिटे
दोन तीन
  1. 2 कपकापून पालक
  2. 1 कपकापून कोथिंबीर
  3. 1 टेबलस्पूनहिरवी मिरची लसूण पेस्ट
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 1/2 टीस्पूनओवा
  7. 1/4 टीस्पूनहळद, हिंग
  8. 1/2 कपबेसन पीठ
  9. 1/4 कपतांदळाचे पीठ
  10. चवीनुसारमीठ
  11. तळण्यासाठी तेल
  12. 1 टेबलस्पूनतिळ

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिटे
  1. 1

    पालक, कोथिंबीर स्वच्छ धुवून, कापून घ्या.

  2. 2

    मिरची लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद, ओवा, जीरे, हिंग, बेसन पीठ, तांदूळ पीठ हे सगळे जिन्नस घालून चांगले मिक्स करावे.

  3. 3

    मिश्रणाचा गोळा करून कुकरच्या डब्यात ठेवून हलक्या हाताने सपाट करून घ्या..व कुकरमध्ये तीन शिट्या काढुन घ्या.

  4. 4

    कुकर थंड झाल्यावर काढून पुर्ण थंड करून घ्या.मग हव्या त्या आकारात वड्या कापून घ्या.

  5. 5

    गॅसवर कढईत तेल गरम करून वड्या खरपूस तळून घ्या.. आणि चपाती, भाकरी,वरणभाता सोबत सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes