खुसखुशीत पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#cpm6
पावसाळ्यात कांदा भज्जी सारखेच अशा खमंग , खुसखुशीत पुऱ्या ही केल्या जातात...अशा गरमागरम पुऱ्या नाश्त्याला , डब्याला किंवा अगदी चहासोबत ही मस्त लागतात..जेवणातील ही एक महत्त्वाचा पदार्थ म्हणूनही खाऊ शकतो ..चला तर मग रेसिपी पाहुयात..

खुसखुशीत पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)

#cpm6
पावसाळ्यात कांदा भज्जी सारखेच अशा खमंग , खुसखुशीत पुऱ्या ही केल्या जातात...अशा गरमागरम पुऱ्या नाश्त्याला , डब्याला किंवा अगदी चहासोबत ही मस्त लागतात..जेवणातील ही एक महत्त्वाचा पदार्थ म्हणूनही खाऊ शकतो ..चला तर मग रेसिपी पाहुयात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ लोक
  1. 1पालक जुडी
  2. 1/2लिंबू
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1-2 टीस्पून धने जीरे पूड
  5. 1 टेबल स्पूनआले लसूण पेस्ट
  6. मुठभर कोथिंबीर
  7. 1 टीस्पूनओवा
  8. हळद, मीठ आवडीनुसार
  9. 2 कपगहू पीठ
  10. 1/2 कपबेसन
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ धुवून,चिरून घ्यावा..मग एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात पालक आणि त्यात थोडा लिंबू पिळून ते पाणी थोड गरम करून घ्यावा..कारण पलकात ॲसिडीक प्रॉपर्टी असते तर थोड लिंबू पिळून तो पालक अर्धा बॉईल केला की बरे असते..

  2. 2

    आता बॉइल केलेला पालक मिक्सर च्या भांड्यात घेऊन त्यात, आले लसूण, मिरच्या, कोथिंबीर घालून याची सरबरीत पेस्ट करून घ्यावी..

  3. 3

    आता परातीत किंवा बाउल मध्ये गहू पीठ घेऊन त्यात बेसन आणि मिक्सर मधल वाटण, २ टेबलस्पून तेल, हळद, मीठ, ओवा आणि मीठ घालुन थोड पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यावा..आणि कमीतकमी २० मिन झाकून रेस्ट साठी ठेवावा..

  4. 4

    आता या मळलेल्या गोळ्यांचे पुऱ्या लाटून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तळून घ्याव्यात..आणि गरमागरम सर्व्ह कराव्यात..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

Similar Recipes