पारंपारिक घारगे/ लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharghe recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#ashr
#घारगे
# आषाढी स्पेशल भोपळ्याचे घारगे

पारंपारिक घारगे/ लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharghe recipe in marathi)

#ashr
#घारगे
# आषाढी स्पेशल भोपळ्याचे घारगे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मि
7-8 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीकिसलेला लाल भोपळा
  2. 3/4 वाटीगुळ
  3. 1.5 वाटीगव्हाचे पीठ
  4. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर
  6. 1 टीस्पूनजायफळ पावडर
  7. 1 टेबलस्पूनतूप
  8. चवीनुसारमीठ
  9. गरजेनुसार पाणी
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

40-45 मि
  1. 1

    प्रथम भोपळा किसून घेणे.गुळ सुद्धा छान किसून किंवा बारीक कापून घेणे.

  2. 2

    आता कढईमध्ये तूप ऍड करून मध्यम आचेवर गरम करा त्यामध्ये किसलेला भोपळा ॲड करून छान दोन मिनिटे परतून घ्या आता या मध्ये गूळ ॲड करा.

  3. 3

    थोड्यावेळातच गुळ मेल्ट झालेला दिसेल आता या गुळा मध्ये हा भोपळा आपल्याला शिजवुन घ्यायचा आहे. दहा मिनिटे छान गूळ आणि भोपळा शिजवून घेणे. आता यामध्ये जायफळ पावडर आणि वेलची पावडर ॲड करून छान मिक्स करून मिश्रण छान थंड होण्यासाठी ठेवा.

  4. 4

    आता गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ मिक्स करून त्यांनी मध्ये थोडेसे मीठ ऍड करा आता यामध्ये भोपळ्याचा मिश्रण घालून छान घारगेयाचे पीठ मळून घ्या.गरज वाटली तरच थोडेसे पाणी घालुन पिठ मळा आता झाकून अर्धा तास बाजूला ठेवा.

  5. 5

    अर्ध्या तासानंतर पीठ पुन्हा एकदा मळून घ्या आणि छोटे छोटे गोळे तयार करून लाटण्याने घारगे लाटून घ्या (फुगलेले घारगे हवे असतील तर थोडे जाडसर लाटून घेणे पातळ लाटले तर घारगे छान कुरकुरीत होतात)

  6. 6

    आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करा आणि तयार केलेले घारगे छान सोनेरी रंगामध्ये तळून घ्या.

  7. 7

    मस्त असे छान खुसखुशीत आणि गोड घारगे तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

Similar Recipes