आलू पराठा (Aloo paratha recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

सर्वांना आवडणारा, झटपट होणारा असा हा पराठा.

आलू पराठा (Aloo paratha recipe in marathi)

सर्वांना आवडणारा, झटपट होणारा असा हा पराठा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
१-२ जणांसाठी
  1. 1उकडलेला बटाटा
  2. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  3. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  5. 1/2 टीस्पूनधने पावडर
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनगरम मसाला
  8. २-३‌ चिमूटभर चाट मसाला
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. 2-3चपाती चे कणीक
  11. वरून लावण्यासाठी तेल किंवा तूप

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    उकडलेल्या बटाट्याची साल काढून किसणीने किसून घेणे. सर्व मसाले व मीठ घालून घेणे. कसुरी मेथी हातावर चोळून घालणे.

  2. 2

    मिश्रणाचा व्यवस्थित गोळा करून घेणे. त्या गोळ्याचे व मळलेल्या कणकेचे छोटे-छोटे समान गोळे करून घेणे. कणकेची पारी करून त्यात मिश्रणाचा एक गोळा ठेवून व्यवस्थित उंडा करून घेणे.

  3. 3

    पोळपाटावर पीठ टाकून मध्यम जाडसर पराठा लाटून घेणे. तापलेल्या तव्यावर थोडेसे तेल किंवा तूप लावून घेणे. लाटलेला पराठा तव्यावर टाकून, दोन्ही बाजूने तूप किंवा तेल लावून व्यवस्थित भाजून घेणे.

  4. 4

    अशाप्रकारे सर्व पराठे करून घेणे. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत खावे. तसेही छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes