झटपट मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#BR2
भाजी रेसीपी

#मुळा
#Raddish

झटपट मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)

#BR2
भाजी रेसीपी

#मुळा
#Raddish

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 ते 15 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 2मोठे मुळे
  2. 1कांदा छोटा
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 1-1/2 टीस्पूनलाल तिखट
  8. 2ते 3 टेबलस्पून शेंगदाणा कूट
  9. मीठ चवीनुसार
  10. 1/2 टीस्पूनगूळ पावडर
  11. कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 ते 15 मिनिटे
  1. 1

    प्रथम मुळे सोलून धून घ्या. नंतर किसणी वर किसून घ्या. नंतर किसलेला मुळा दोन्ही हातावर थोडा थोडा घेऊन त्यातले पाणी काढून टाका.(म्हणजे भाजी करताना त्याला पाणी सुटणार नाही)
    कांदा बारीक चिरून घ्या.

  2. 2

    कढईत तेल तापत ठेवा. त्यात मोहरी, हिंग,हळद घाला. कांदा घालून परतून घ्यावा. त्यात किसलेला मुळा घाला एकजीव करून घ्या. झाकण ठेवून मुळा शिजवून घ्या. नंतर त्यात मीठ चवीनुसार, गूळ पावडर, लाल तिखट, घालून मिक्स करावे. शेंगदाणा कूट घालून एकजीव करावे. झाकण ठेवून एक वाफ काढा. गॅस बंद करावा.

  3. 3

    कोथिंबीर चिरुन मिक्स करून घ्या. मुळ्याची भाजी तयार आहे.

  4. 4

    मुळ्याची भाजी सर्व्ह करा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes