पिठलं भाकरी (pithla recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

#रेसिपीबुक #week3 #नैवेद्य
शेगाव च्या श्री गजानन महाराजांचा हा आवडता नैवेद्य. बुलढाणा जिल्ह्यात असणारे शेगाव पूर्ण महाराष्ट्रात गजानन महाराजांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे येत असतात.इथे महाराजांना पिठलं, भाकरी, ठेचा, कांदा असा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय पिठलं भाकरी हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पदार्थ म्हणावे लागतील एवढे ते घरा घरात बनवले जातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिट
2सर्व्हिंग
  1. 1/2 वाटीबेसन पीठ
  2. 2 टीस्पूनहिरवी मिरची लसूण ठेचा
  3. 1मध्यम आकाराचा कांदा
  4. 1 टीस्पूनजिरे
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनतेल
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

10-15 मिनिट
  1. 1

    कढई मध्ये तेल गरम करून घ्या.

  2. 2

    त्यात जिरे आणि मोहरी घाला

  3. 3

    जिरे मोहरी तडतडली कि त्यात मिरची लसूण चा ठेचा घाला

  4. 4

    आता त्यात कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या

  5. 5

    कांदा लालसर झाला कि त्यात हळद घाला

  6. 6

    थोडं परतून त्यात 1 वाटी पाणी घाला

  7. 7

    पाण्याला उकळी येऊ द्या. उकळी आली कि त्यात बेसन पीठ घाला

  8. 8

    बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या.

  9. 9

    चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला

  10. 10

    5-10 मिनिटे मंद गॅस वर शिजवून घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes