झुणका भाकरी (jhunka bhakri recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#रेसिपीबुक
#week3
आपण शुचिर्भुत मनाने शिजवलेले अन्न स्वतः खाण्यापूर्वी पहिला मान म्हणून देवापुढे 'नैवेद्य' ठेवतो आणि त्याचा आपल्यासाठी प्रसाद होतो.
आम्हा पाचकळशी वाडवळांच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीत 'नैवेद्य' हा विस्तृत विभाग आहे. गणपतीला ओला नारळ आणि गुळाच्या सारणाचे उकडीचे मोदक असोत वा माघी गणपतीला तिळकुटाचे मोदक असोत. गौरीला अळू-कोलंबीचा नेवैद्य असो वा घरजत्रेला कोंबड्याचा नैवेद्य असो. पुरणपोळी, खीर, बासुंदी पासुन पंचपक्वान्नाने सजलेल्या नैवेद्याच्या पानापर्यंत नैवेद्याची यादी फार मोठी आहे.
आज गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरू साईनाथांना त्यांचा आवडता 'झुणका भाकरी' चा नैवेद्य दाखविला. आमच्या पारंपारिक पद्धतीने बनविलेला झुणका, ज्वारीच्या भाकरी, हाताने ठेचून फोडलेला कांदा, लाल मिरचीची चटणी, दही आणि गोड म्हणून गुळ-तुप असे नैवेद्याचे ताट सजले!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अंदाजे दीड तास
४ माणसांसाठी
  1. भाकरी बनविण्यासाठी
  2. 3 वाट्याज्वारीचे पीठ
  3. 3 वाट्यापाणी
  4. 1 चमचातूप
  5. चवीनुसारमीठ
  6. झुणका बनविण्यासाठी
  7. 1 (1/2 कप)बेसन
  8. 3मध्यम आकाराचे कांदे
  9. 1हिरवी मिरची
  10. 1/2 वाटीकोथिंबीर
  11. 5-6 कडीपत्ता
  12. 1/2 टीस्पूनमोहरी
  13. 1/2 टीस्पूनजिरे
  14. 1/2 टीस्पूनहिंग
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. 1 टीस्पूनलाल मिरची पूड
  17. 1 टीस्पूनधणे पूड
  18. 2 टेबलस्पूनगरम पाणी
  19. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

अंदाजे दीड तास
  1. 1

    प्रथम भाकरी बनविण्यासाठी एका बाजूला ३ वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात १ चमचा तूप व चवीनुसार मीठ घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात ज्वारीचे पीठ घालावे. चांगले मिक्स करावे आणि झाकून ठेवावे. उकड काढलेले ज्वारीचे पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. त्याचे गोळे करून भाकरी बनवून घ्यावी.

  2. 2

    झुणका बनवताना प्रथम बेसन हलके भाजून घ्यावे. आता एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घ्यावे तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे,कडीपत्ता,मिरची, लसूण व कांदा घालून परतून घ्यावे. त्यात हळद, हिंग, लाल मिरची पूड, धणेपूड आणि चवीनुसार मीठ घालून कांदा नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे.

  3. 3

    कांदा व्यवस्थित शिजल्यावर त्यात भाजलेले बेसन घालून नीट एकजीव करावे व त्यात गरम पाणी घालून छान मिक्स करून एक वाफ काढून घ्यावी. नंतर त्यात कोथिंबीर घालून छान मिक्स करावे. गरमागरम झुणका भाकर तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या

Similar Recipes