चॉकलेट डोनट 🍩

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1.30 तास
3 जणांसाठी
  1. 1 वाटीमैदा
  2. कोमट पाणी (पीठ मळून घेण्यासाठी)
  3. 2 चमचेपिठीसाखर
  4. आवडीनुसार चॉकलेट सिरप
  5. 2 चमचेबडीशेप
  6. चवीनुसारमीठ
  7. तेल

कुकिंग सूचना

1.30 तास
  1. 1

    एका बाउल मध्ये मैदा चाळून घ्या. त्यामध्ये मीठ, साखर मिसळून घ्या. कोमट पाण्याने पीठ 10 ते 15 मिनिटे छान मळून घ्या.पीठ व्यवस्थित मळले पाहिजे. झाकण ठेवून मळलेले पीठ अर्धा बाजूला ठेवा.पिठाचा गोळा मस्त फुलून येतो. दुप्पट होतो.

  2. 2

    एक गोळा घेऊन पोळी थोडी जडसारच लाटायची.जो आकार आपल्याला हवा त्या आकारात कापू शकता. डोनटचा गोलसर आकार वाटीने द्यावा. मधोमध छोट्या झाकणाने अजून छोटा गोल करून घ्यायचा. अशाप्रकारे सर्व पिठाचे गोळे करून जाडसर लाटून डोनट तयार करून घेणे.

  3. 3

    तेल गरम करून मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. म्हणजे डोनट आतून कच्चे राहत नाहीत.अशाप्रकारे सर्व डोनट तळून थंड होण्यास ठेवावे

  4. 4

    डिशमध्ये चॉकलेट सिरप घेऊन त्यामधे एक एक डोनट बुडवून रंगीत बडीशेप ने डोनट सजवा.

  5. 5

    अशाप्रकारे यम्मी डोनट 🍩 तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes